शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

G20 Summit: गांधीजींच्या विश्वस्ततेच्या तत्त्वाने रुजली भारत-अमेरिका भागीदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 07:02 IST

G20 Summit: भारत-अमेरिका भागीदारी महात्मा गांधींच्या विश्वस्ततेच्या तत्त्वात रुजलेली आहे, असे गौरवोद्गार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी काढले. बायडेन आणि इतर जी-२० नेत्यांनी रविवारी नवी दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. 

हनोई - भारत-अमेरिका भागीदारी महात्मा गांधींच्या विश्वस्ततेच्या तत्त्वात रुजलेली आहे, असे गौरवोद्गार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी काढले. बायडेन आणि इतर जी-२० नेत्यांनी रविवारी नवी दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. 

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये बायडेन यांनी म्हटले आहे की, भारत-अमेरिका भागीदारी महात्मा गांधींच्या विश्वस्ततेच्या तत्त्वात रुजलेली आहे. आज आम्हाला येथे आणल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. व्हिएतनाममधील हनोई येथे अधिकृत भेटीवर असलेल्या बायडेन यांनी महात्मा गांधींना आदरांजली अर्पण करताना त्यांचे आणि जी-२० नेत्यांचे छायाचित्रदेखील पोस्ट केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायडेन आणि इतर नेत्यांचे स्वागत केले. जगभरातील या प्रमुख नेत्यांनी राजघाटावर पुष्पांजली अर्पण करून महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. बायडेन यांनी १९ सेकंदाचा एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, आज राजघाट स्मारकाला भेट देणे ही आमच्यासाठी सन्मानाची बाब होती. महात्मा गांधींचा अहिंसा, आदर आणि सत्याचा संदेश आज नेहमीपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. तो जगाला प्रेरणा देत राहील. 

भारताला ब्रिक्स, क्वाड, जी-७मध्ये सहभागी होण्याचा लाभभारताचे माजी विदेश सचिव जी-२०चे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रंगला यांनी सांगितले की, भारत जगातील जी-७, ब्रिक्स, क्वाडसारख्या संघटनांमध्ये सहभागी आहे. याचा लाभ त्याला मिळाला आहे. जी-७मध्ये भारत विशेष आमंत्रित सदस्य आहे. यात अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसारखे देश व ब्रिक्समध्ये चीन, ब्राझील, रशियासारखे देश, क्वाडमध्ये ऑस्ट्रेलिया, जपानसारख्या देशांशी चर्चा करण्यात व मतैक्य करणे सोपे झाले.  

चिनी पंतप्रधानांचे डोळे दिपले....बीजिंग :  जी-२० शिखर परिषदेत सहभागी न होण्याचा कठीण निर्णय घेऊन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान ली कियांग यांच्यावर ही जबाबदारी सोपवली, परंतु  नवी दिल्लीत दोन दिवस त्यांना अत्यंत कठीण गेले. भारताने सर्व बाबतीत परिषद यशस्वी करून जो प्रसिद्धीझोत मिळवला, त्यामुळे त्यांचे डोळे अशरश: दिपून गेले.   युक्रेन प्रश्नावर चीन व रशियाचे मतभेद असतानाही भारताने मध्यम मार्ग काढून संयुक्त जाहीरनाम्याला सर्वांचे समर्थन मिळवले. त्याला खुद्द पंतप्रधान ली कियांग यांना समर्थन करावे लागले. हे यजमान भारतासाठी सर्वात मोठे यश आहे. याशिवाय त्यांना पाश्चात्त्य नेत्यांबरोबरच्या बैठकाही कठीण परीक्षा घेणाऱ्या ठरल्या. विशेषत: इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी चीनच्या प्रसिद्ध ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) मधून माघार घेण्याचे संकेत दिले. शिखर परिषदेच्या गडबडीत भारताने यशस्वी राजनैतिक मोहिमेनंतर आफ्रिकी संघाला जी-२० चा स्थायी सदस्य म्हणून प्रवेश मिळवून दिल्याने भारताची वाहवा झाली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीG20 Summitजी-२० शिखर परिषद