शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

G20 Summit: ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक सपत्नीक अनवाणी चालत मंदिरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 06:29 IST

G20 Summit: ब्रिटन आणि जगभरातील सुमारे बाराशे स्वामीनारायण मंदिरांच्या शृंखलेतील सर्वात मोठे मंदिर ठरलेल्या अक्षरधाम मंदिरात सपत्नीक दर्शन घेत जी-२० संमेलनातील सर्वात तरुण पंतप्रधान ऋषी सुनक यांनी रविवारी आपल्या हिंदुत्वाची पुन्हा एकदा साक्ष पटवली.  

- सुनील चावके नवी दिल्ली - ब्रिटन आणि जगभरातील सुमारे बाराशे स्वामीनारायण मंदिरांच्या शृंखलेतील सर्वात मोठे मंदिर ठरलेल्या अक्षरधाम मंदिरात सपत्नीक दर्शन घेत जी-२० संमेलनातील सर्वात तरुण पंतप्रधान ऋषी सुनक यांनी रविवारी आपल्या हिंदुत्वाची पुन्हा एकदा साक्ष पटवली.  

मंदिर परिसरात पावसात छत्री घेऊन सुनक दाम्पत्य अनवाणी चालत गेले. पाऊणतासाच्या वास्तव्यादरम्यान त्यांनी एका मंदिरात जलाभिषेक केला आणि मंदिरातील सर्व देवदेवतांना फुले वाहून गुडघे टेकून साष्टांग दंडवत केला. 

सुनक दाम्पत्य सुमारे तासभर मंदिरात होते. सुनक यांनी निवेदनात म्हटले आहे की, “आज सकाळी स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला भेट देऊन मला आणि माझ्या पत्नीला आनंद झाला. या मंदिराचे सौंदर्य, तेथील शांतता, सौहार्द आणि एक चांगला माणूस बनण्याचा सार्वत्रिक संदेश पाहून आम्ही थक्क झालो. हे केवळ प्रार्थनास्थळच नाही तर एक ऐतिहासिक स्थळही आहे, जे भारताची मूल्ये, संस्कृती आणि जगाला दिलेले योगदान दर्शवते.’’

२० लाख भारतीय ब्रिटनमध्ये आहेत. १४ स्वामी नारायण मंदिरे तेथे आहेत.२०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सुनक यांच्यासाठी इंग्लंडमध्ये राहणाऱ्या लाखो भारतीयांची मते महत्त्वाची ठरणार आहेत.

टॅग्स :Rishi Sunakऋषी सुनकG20 Summitजी-२० शिखर परिषद