शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचे राष्ट्रपती झाल्यानंतर बायडेन पहिल्यांदाच भारतात; PM मोदींसोबत या मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 21:02 IST

G20 summit 2023: पंतप्रधानांच्या निवासस्थानी भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार असून या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

 भारतात होत असलेल्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन दिल्लीत पोहोचले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले आहेत. विमानतळावर केंद्रीय मंत्री व्ही के सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार असून या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा - पीएम मोदी आणि ज्यो बायडेन यांच्या द्विपक्षीय बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. यात संरक्षण सहकार्य, दहशतवादाला विरोध करणे, सायबर सुरक्षा सहकार्य, व्यापार आणि आर्थिक संबंध, भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा क्षेत्र, हवामान बदल, अंतराळ सहकार्य, आरोग्य क्षेत्रातील सहकार्य, शिक्षण, सांस्कृतिक सहकार्य, इंडो-पॅसिफिक, आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर द्विपक्षीय संबंध आणि तंत्रज्ञान आदींवर चर्चा होऊ शकते.

QUAD च्या विस्तारासंदर्भातही होऊ शकते चर्चा - भारत आणि अमेरिका यांच्यात इंडो-पॅसिफिकमध्ये दोन्ही देशांच्या भागीदारीवरही चर्चा होऊ शकते. तसेच, एकत्रितपणे QUAD चा विस्तार करण्यासंदर्भातही चर्चा होऊ शकते. याशिवाय दोन्ही देशांमध्ये डिफेन्स क्षेत्रातील भागीदारी, न्यूक्लिअर एनर्जी, अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा, चीनच्या विस्तारवादी धोरणास लगाम लावणे, आदी मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. माध्यमांतील वृत्तांनुसार, मोदी आणि बायडेन यांच्यात 31 MQ-9B रीपर ड्रोन खरेदीसंदर्भातही चर्चा होऊ शकते. विशेष म्हणजे, या डीलला संरक्षण अधिग्रहण परिषदेनेही मान्यता दिली आहे. अशा अनेक मुद्द्यांवर भारत आणि अमेरिका यांच्यात चर्चा होईल.

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदी