शहरं
Join us  
Trending Stories
1
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
2
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! मुळात पडळकर हा विषय अत्यंत गंभीर...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
13
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
14
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
15
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
16
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
17
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

दोन राज्यपालांचे भवितव्य अनिश्चित

By admin | Updated: September 10, 2016 03:32 IST

अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांची गच्छंती लांबणीवर पडली आहे;

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांची गच्छंती लांबणीवर पडली आहे; परंतु या दोघांना राज्यपालपदावरून हटविण्यामागचे कारण वेगवेगळे आहे. तथापि, माहीतगार सूत्रांनुसार जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदाच्या शर्यतीत अनिल बैजल यांचे नाव आघाडीवर आहे.अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा यांना हटविण्याचा निर्णय तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडला आहे. बुधवारी गृहमंत्री राजनाथसिंग यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन राजखोवा यांना हटविण्यामागचा सरकारचा हेतू काय आहे, हे कळविले. अरुणाचलात राजकीय पेच निर्माण झाला तेव्हा राजखोवा यांनी हे प्रकरण हाताळताना घटनात्मक तत्त्वांचे उल्लंघन केले. यावरून सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना चपराक दिली होती. असे असले तरी केंद्रीय मंत्रिमंडळाने राज्यपालांच्या शिफारशी जशाच्या तशा मंजूर केल्या होत्या. असे काही महत्त्वाचे मुद्दे राष्ट्रपतींनी उपस्थित केल्याचे समजते.पंतप्रधानांनी काही प्रश्न उपस्थित केले तेव्हा राजखोवा यांनी दिशाभूल केली होती, असेही गृहमंत्र्यांनी राष्ट्रपतींना सांगितल्याचे समजते. यातून राज्यपाल आणि सरकारदरम्यान विश्वासाचा अभाव असल्याचे दाखविते. त्यांना हटविणे हाच एकमेव मार्ग आहे. आता राजखोवा यांना हटविण्यासाठी योग्य मार्ग शोधला जात असल्याचे कळते.एन. एन. व्होरा यांना बदलणे किंवा हटविण्यासंदर्भातील स्थिती संवेदनशील, तसेच किचकट आहे. व्होरा हे अनुभवी नोकरशहा आहेत; परंतु त्यांचे वय ८० वर्षे आहे. काश्मीर खोऱ्यातील स्थितीच्या अनुषंगाने त्यांच्याकडे नवीन योजना नाहीत. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरही त्यांना दोन वर्षांपेक्षा अधिक काळ पदावर कायम ठेवण्यात आले. आता मात्र सरकारला त्यांच्या जागी नवीन व्यक्तीची नियुक्ती करायची आहे. राज्यपाल म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी २०१३ मध्ये व्होरा यांची नियुक्ती करण्यात आली होती. व्होरांच्या जागी अनिल बैजल यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे. वाजपेयी सरकारमध्ये ते गृहसचिव होते. व्होरा यांची बदली करावी की, हटवावे, अशी समस्या भेडसावत आहे. लष्करी किंवा गुप्तचर विभागाची पार्श्वभूमी नसलेले व्होरा जम्मू-काश्मीरचे राज्यपालपद भूषविणारी पहिली व्यक्ती आहे. १९९० मध्ये जगमोहन यांना हटविण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी गिरीश चंद्र सक्सेना (‘रॉ’चे माजी प्रमुख),जन. के. व्ही. कृष्णराव आणि जन. एस. के. सिन्हा यांनी राज्यपालपद सांभाळले होते.>एन.एन. व्होरा यांना बदलणे किचकटएन. एन. व्होरा यांना बदलणे किंवा हटविण्यासंदर्भातील स्थिती संवेदनशील, तसेच किचकट आहे. व्होरा हे अनुभवी नोकरशहा आहेत; परंतु त्यांचे वय ८० वर्षे आहे. काश्मीर खोऱ्यातील स्थितीच्या अनुषंगाने त्यांच्याकडे नवीन योजना नाहीत. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरही त्यांना दोन वर्षांपेक्षा अधिक काळ पदावर कायम ठेवण्यात आले.