नवी दिल्ली - देशाचे माजी वित्तमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्यावर आज दुपारी दिल्लीती निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण जेटलींचा मुलगा रोहन यांने त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला. गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंजत असलेल्या अरुण जेटली यांचे शनिवारी दुपारी निधन झाले होते. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी आज सकाळी अरुण जेटली यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानावरून भाजपाच्या मुख्यालयात आणण्यात आले होते. तेथे भाजपाच्या अनेक नेत्यांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली अनंतात विलीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 15:34 IST