शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

२,५५७ कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार, सरकारचा दावा फक्त १०४ मृत्यूचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 06:13 IST

भोपाळमधील चित्र : संख्या कमी नोंदवली जात असल्याचा आरोप

ठळक मुद्देराज्यातील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यात कोविडमुळे मरण पावलेल्यांची खरी संख्या नोंद करीत नाही या आरोपांचा मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी नुकताच इन्कार केला होता

भोपाळ : भोपाळ जिल्ह्यात गेल्या एप्रिल महिन्यात कोरोनामुळे मरण पावलेल्या २५५७ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे येथील स्मशानभूमींचे व्यवस्थापक म्हणत असले तरी जिल्ह्यात कोविडमुळे गेल्या महिन्यात फक्त १०४ जणच मरण पावल्याचे राज्य सरकार म्हणत आहे. २५५७ आणि १०४ या आकड्यांतील प्रचंड तफावत शहरात कोविड-१९ मुळे मरण पावलेल्यांची नोंद कमी केली गेली या दाव्याला दुजोरा देणारी आहे. दोन स्मशानभूमींचे व्यवस्थापक आणि भोपाळमधील कब्रस्तानच्या अध्यक्षाने सांगितले की, भोपाळ जिल्ह्यात कोरोनामुळे मरण पावलेल्या २५५७ जणांसह ३८११ जणांवर गेल्या महिन्यात अंत्यसंस्कार केले गेले.

राज्यातील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यात कोविडमुळे मरण पावलेल्यांची खरी संख्या नोंद करीत नाही या आरोपांचा मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी नुकताच इन्कार केला होता. जिल्ह्यात झाडा कब्रस्तान आणि भडभडा स्मशानभूमीला कोविड-१९ मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे अधिकार दिले गेले होते, असे अधिकारी म्हणाला. नंतर कोविड-१९ मृतांची संख्या वाढल्यामुळे सुभाषनगर विश्राम घाट स्मशानभूमीतही कोविड-१९ मृतांवर अंत्यसंस्कार केले जाऊ लागले. सुभाष नगर विश्राम घाट स्मशानभूमीचे व्यवस्थापक शोभराज सुखवाणी म्हणाले की,  या स्मशानभूमीत गेल्या महिन्यात १३८६ जणांवर अंत्यसंस्कार केले गेले. त्यात ७२७ जण हे कोविड-१९ मुळे मरण पावलेले होते.”

गतमहिन्यात २ हजारांहून अधिक अंत्यसंस्कारगेल्या महिन्यात दोन हजार ५२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यात १६५४ जण कोरोनाबाधित होते, असे भडभडा विश्राम घाट स्मशानभूमीचे सचिव ममतेश शर्मा म्हणाले. हे १६५४ मृतदेह कोरोनावरील उपचार केंद्रांवरून हवाबंद प्लॅस्टिक पिशव्यांत घालून थेट स्मशानभूमीत पाेहोचविण्यात आले होते व त्यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेश