शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

विसरून जाण्याचा मूलभूत अधिकार; वेबसाइटवरून दोषमुक्तीचा आदेश काढून टाकण्याचे हायकोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 09:04 IST

फौजदारी खटल्यातून निर्दोष मुक्त झालेल्या एकाने कोर्टाच्या संकेतस्थळावरून दोषमुक्तीचा आदेश काढून टाकण्यासाठी अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

डॉ. खुशालचंद बाहेतीमुंबई : फौजदारी खटल्यातून निर्दोष मुक्त झालेल्या एकाने कोर्टाच्या संकेतस्थळावरून दोषमुक्तीचा आदेश काढून टाकण्यासाठी अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका मान्य केली आहे.

२०१३ मध्ये माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ ए अंतर्गत गुन्ह्यांत या व्यक्तीचे नाव आरोपी म्हणून नोंदण्यात आले होते. नागपुरातील न्यायालयाने त्यांना यातून निर्दोष मुक्त केले. नेहमीप्रमाणे दोषमुक्तीचा आदेश न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आला.

सध्या ही व्यक्ती टोकियो, जपानमध्ये काम करत आहे. न्यायालयाच्या संकेतस्थळावरील या आदेशामुळे त्यांना नोकरी मिळण्यात अडचणी येत असल्यामुळे त्यांना व्यावसायिक जीवनात दुष्परिणाम भोगावे लागू नयेत म्हणून न्यायालयाच्या वेबसाइटवरून दोषमुक्तीचा आदेश काढून टाकण्याची विनंती करणारी याचिका त्यांनी दाखल केली. त्यांचा असा युक्तिवाद होता की, जरी हा आदेश निर्दोष सुटण्याचा आहे, तरीही यामुळे मालक, ग्राहक, बँकर्स आणि गुंतवणूकदारांच्या मनात पूर्वग्रह निर्माण होतो. 

हायकोर्टाने या समस्येला गोपनीयतेचा अधिकार किंवा विसरण्याचा अधिकार याबरोबर जोडत व्यापक महत्त्व दिले आहे. ही याचिका स्वीकारताना हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाच्या पुट्टास्वामी प्रकरणामधील निर्णयाचा संदर्भ दिला. पुट्टास्वामी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने गोपनीयतेच्या आणि एकांतवासात राहण्याच्या अधिकारांना भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ चा एक घटक म्हणून मान्यता दिली आहे.

हायकोर्टाचे आदेश- कोर्टाच्या वेबसाइटवरून आणि डेटाबेसमधून दोषमुक्तीचा निर्णय काढून टाकावा.- केसच्या मूळ कागदपत्रांच्या बाबतीत प्रचलित नियमानुसारच कार्यवाही होईल.- जर कोणी या केसचे रेकॉर्ड मागितले, तर नेहमीच्या नियमांचे आणि पद्धतींचे पालन करावे. शिवाय अर्जदारास ही माहिती का हवी  आहे, याचे शपथपत्र घेऊन निर्णय घ्यावा.- हे आदेश भविष्यातील कोणत्याही केससाठी उदाहरण म्हणून देता येणार नाहीत.    -(न्यायमूर्ती जी. एस. पटेल आणि माधव जे. जामदार)