शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये सेवाशुल्क पूर्णपणे ऐच्छिक

By admin | Updated: January 3, 2017 05:16 IST

हॉटेल आणि उपाहारगृहांनी ग्राहकांना बिलामध्ये परस्पर ‘सर्व्हिस चार्ज’ लावणे बेकायदा आहे. त्यामुळे अशा आस्थापनांनी ‘सर्व्हिस चार्ज’ पूर्णपणे ऐच्छिक असल्याचे फलक दर्शनी भागात लावून कोणतीही

नवी दिल्ली : हॉटेल आणि उपाहारगृहांनी ग्राहकांना बिलामध्ये परस्पर ‘सर्व्हिस चार्ज’ लावणे बेकायदा आहे. त्यामुळे अशा आस्थापनांनी ‘सर्व्हिस चार्ज’ पूर्णपणे ऐच्छिक असल्याचे फलक दर्शनी भागात लावून कोणतीही सक्ती न करता ग्राहकाने समाधानकारक सेवेची बक्षिशी म्हणून बिलाखेरीज वर आणखी काही रक्कम दिली तर तेवढीच स्वीकारावी, असा आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने काढला आहे.अनेक हॉटेल आणि रेस्टॉरन्टमध्ये दिलेली सेवा कशीही असली तरी, ‘टिपे’ला पर्याय म्हणून बिलामध्येच ५ ते २० टक्के ‘सर्व्हिस चार्ज’ लावून तो देणे ग्राहकांसभाग पाडले जाते, अशा अनेक तक्रारी आल्यानंतर मंत्रालयाने ग्राहक संरक्षण कायद्याचा हवाला देऊन हा खुलासा केला आहे.मंत्रालय म्हणते की, अशा प्रकारे सक्तीने ‘सर्व्हिस चार्ज‘ची वसुली बेकायदा आणि अनुचित व्यापारप्रथा असल्याने ग्राहकाने स्वत:ला वाटले तरच बिलाखेरीज आणखी रक्कम स्वखुशीने द्यावी. हॉटेल किंवा बिलातच उपाहारगृह अशी रक्कम समाविष्ट करत असेल तर ग्राहक त्याविरुद्ध ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागू शकतात व त्यांनी ती जरूर मागावी.या तक्रारी आल्यानंतर मंत्रालयाने इंडिया हॉटेल्स असोसिएशनला पत्र लिहून यावर त्यांचे म्हणणे मागविले असता असोसिएशननेही ‘सर्व्हिस चार्ज’ पूर्णपणे ऐच्छिक असल्याने ग्राहक मिळालेल्या सेवेने असमाधानी असेल तर, अशी रक्कम बिलात लावली असेल तरी, तो ती कमी करून घेऊ शकतो, असे कळविले.सर्व राज्य सरकारांनी वरीलप्रमाणे कायदेशीर तरतुदींची सर्व हॉटेल व उपाहारगृहांना जाणीव करून द्यावी आणि ‘सर्व्हिस चार्ज’ ऐच्छिक आहे व समाधानकारक सेवा मिळाली द्यावी. हॉटेल किंवा उपाहारगृह बिलातच अशी रक्कम समाविष्ट करत असेल तर ग्राहक त्याविरुद्ध ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागू शकतात व त्यांनी ती जरूर मागावी. या तक्रारी आल्यानंतर मंत्रालयाने इंडिय हॉटेल्स असोसिएशनला पत्र लिहून यावर त्यांचे म्हणणे मागविले असता असोसिएशननेही ‘सर्व्हिस चार्ज’ पूर्णपणे ऐच्छिक असल्याने ग्राहक मिळालेल्या सेवेने असमाधानी असेल तर, अशी रक्कम बिलात लावली असेल तरी, तो ती कमी करून घेऊ शकतो, असे कळविले.सर्व राज्य सरकारांनी वरीलप्रमाणे कायदेशीर तरतुदींची सर्व हॉटेल व उपाहारगृहांना जाणीव करून द्यावी आणि ‘सर्व्हिस चार्ज’ ऐच्छिक आहे व समाधानकारक सेवा मिळाली नाही तर अशी रक्कम बिलात लावली असेल तरी ती कमी करून दिली जाईल, असे फलक त्यांना दर्शनी भागात लावण्यास सांगावे, असेही मंत्रालयाने कळविले आहे.--------केवळ बड्या रेस्टॉरन्टमध्येच सेवाशुल्क आकारले जाते. हे शुल्क याआधीही ऐच्छिकच होते. आम्ही मेन्यूच्या खाली तशी सूचनाही देतो. त्यामुळे ज्या ग्राहकाला हे शुल्क द्यायचे नसेल, तो निघून जाऊ शकतो. मात्र जेवण झाल्यानंतर समाधान झाले नाही, तर सेवाशुल्क न देण्याचे स्वतंत्र्य ग्राहकांना देण्याचा केंद्राचा मानस असेल, तर ते अत्यंत अव्यवहार्य आहे. त्यामुळे त्याला साहाजिक सर्व हॉटेल व्यावसायिकांकडून विरोधच होईल.- आदर्श शेट्टी, अध्यक्ष, आहार मुंबई.