शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

माहिती आहे का ? पेट्रोल, डिझेल भरता तेव्हा स्वच्छ शौचलायासाठीही तुम्ही देता पैसे

By शिवराज यादव | Updated: August 23, 2017 16:16 IST

पेट्रोल पंपांवर असणारी शौचालयं स्वच्छ ठेवण्यासाठी अतिरिक्त पैसे आकारले जातात

नवी दिल्ली, दि. 23 - अनेकांना माहित नसेल पण जेव्हा पेट्रोल पंपावर जाऊन आपण पेट्रोल किंवा डिझेल भरतो तेव्हा लीटरमागे चार ते सहा पैसे आपण स्वच्छ शौचालयासाठी देत असतो. पेट्रोल पंपांवर असणारी शौचालयं स्वच्छ ठेवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीव्यतिरिक्त अतिरिक्त पैसे आकारले जात असतात. पेट्रोलिअम मंत्रालयचे अधिकारी आणि पेट्रोल पंप मालकांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे आकारले जात असले तरी जमा होणारी रक्कम पर्याप्त नसल्याचा दावा पेट्रोल पंप मालक करत आहेत. 

पेट्रोल पंप वाटप करताना आखलेल्या नियमांमध्ये स्वच्छ शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्याची अट आहे. ज्या पेट्रोल पंपावर शौचालयांची अवस्था बिकट आहे, तसंच जे पेट्रोलपंप शौचलायांची योग्य काळजी घेत नाही आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचं पेट्रोलिअम मंत्रालयाच्या अधिका-यांनी सांगितलं आहे. 

एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'डिझेल - पेट्रोल विक्री करताना अतिरिक्त आकारण्यात येणारे पैसे पर्याप्त नसल्याच्या पेट्रोल पंप मालकाचा दावा योग्य आहे, मात्र ते कमिशन घेतात हेदेखील खरं आहे. कोणतीही कारणं न देता अट पुर्ण करणं अनिवार्य आहे. आम्ही लोकांना आवाहन करतो की त्यांनी स्वच्छता अॅपचा वापर करावा, आणि या माध्यमातून शौचालयांची माहिती द्यावी. या शौचालयांचा वापर कोणीही करु शकतं'. 

ऑल इंडिया पेट्रोलिअम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बंसल यांनी सांगितलं आहे कीस 'एका पेट्रोल पंपावर दरमहिना किमान एक लाख 70 हजारांच्या पेट्रोल - डिझेलची विक्री होते. यानुसार शौचलयांची देखभाल करण्यासाठी नऊ हजार रुपये जमा होतात. मात्र शौचालयाची देखभाल घ्यायचं ठरल्यास किमान तीन जणांना कामावर ठेवावं लागेल. याशिवाय पाणी आणि इतर गरजेच्या वस्तूंचा वेगळा खर्च असतो'. 

पेट्रोल दराचा भडका, भाव उच्चांकी पातळीवरगेल्या दीड महिन्यात पेट्रोलच्या भावात लिटरमागे साधारण तीन ते चार रुपये आणि गेल्या वर्षभरात तब्बल १२ ते १४ रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईत १९ ऑगस्ट रोजी हिंदुस्थान पेट्रोलियमचे पेट्रोलचे दर ७७ रुपये५४ पैसे होते. वर्षभरापूर्वी १६ ऑगस्टला हेच दर ६५ रुपये ०३ पैसे होते. म्हणजे वर्षभरात लिटरमागे झालेली वाढ १२ रुपये ५१ पैसे येते. दीड महिन्यापूर्वी मुंबईत ७४ रुपये ३५ पैसे असलेले पेट्रोलचे दर तीन रुपये १९ पैशांनी वाढले आहेत.  केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीचा आढावा १५ दिवसाआड घेण्याऐवजी दररोज घेण्याचा निर्णय यंदा १६ जूनपासून घेतला.  त्यामुळे हळूहळू होणारी ही दरवाढ पटकन कुणाच्या लक्षातही येत नाही कारण दिवसाला १०-१२ पैसे झालेली वाढ फार वाटत नाही पण कालांतराने तिचा एकत्रित परिणाम मोठा झालेला दिसतो.  

 

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंप