शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Case: बलात्कारानंतर ११ दिवसांच्या नमुन्यांवर फॉरेन्सिक रिपोर्ट निरर्थक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 06:45 IST

Hathras Gangrape Case: जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचा दावा

लखनौ : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या दलित मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर अकरा दिवसांनी फॉरेन्सिक परीक्षणासाठी नमुने गोळा करण्यात आले होते. त्यामुळे त्यावर आधारित फॉरेन्सिक अहवाल निरर्थक ठरतो, असे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अझीम मलिक यांनी म्हटले आहे.दलित मुलीवर बलात्कार झालेला नाही असे उत्तर प्रदेशचे पोलीस फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे सांगत आहेत. बलात्काराची घटना घडल्यानंतर ९६ तासांच्या आत तपासणीसाठी गोळा केलेल्या नमुन्यांतच खरा पुरावा सापडू शकतो, असे याबाबत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे. त्यामुळे ११ दिवसांनंतर गोळा केलेल्या नमुन्यांच्या आधारे तयार केलेला अहवाल विश्वासार्ह ठरत नाही, असेही डॉ. अझीम मलिक यांनी सांगितले.बलात्काराची घटना उजेडात आल्यानंतर दलित मुलीवर जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दोन आठवडे उपचार सुरू होते. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला होता. मात्र, या दलित मुलीला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेचा शवचिकित्सा अहवालही सफदरजंग रुग्णालयानेच तयार केला होता. दलित मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेसने विविध राज्यांत जिल्हास्तरावर निदर्शने केली.आपचे नेते संजय सिंह यांच्यावर शाई फेकलीहाथरस जिल्ह्यातील दलित मुलीच्या गावी जाऊन तिच्या नातेवाईकांना भेटल्यानंतर आप पक्षाचे नेते संजय सिंह यांच्या अंगावर एका व्यक्तीने शाई फेकली. त्यांना काळे फासण्याचा या हल्लेखोराचा इरादा होता. मात्र, त्यातून संजय सिंह बचावले. सुरक्षा रक्षकांनी या हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. शाई फेकणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या.हे तर बदनामी व सरकार पाडण्याचे कारस्थानलखनौ : काही लोक माझे सरकार पाडण्याचे व भाजप कार्यकर्त्यांची बदनामी करण्याचे कारस्थान रचत आहेत. त्यांना जातीय दंगली घडवायच्या आहेत आणि विद्वेष पसरवायचा आहे, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस घटनेनंतर विरोधकांवर केला.काँग्रेस व समाजवादी पक्षाने हा आरोप फेटाळून लावला. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात योगी सरकार पूर्णत: अयशस्वी ठरले आहे आणि महिलांवर अत्याचार वाढत आहेत. हे अपयश लपविण्यासाठी योगी आदित्यनाथ खोट्यानाट्या बातम्या पसरवीत आहेत, अशी टीका या दोन्ही पक्षांनी केली.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार