शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
4
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
6
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
7
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
8
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
9
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
10
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
11
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
12
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
13
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
14
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
15
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
16
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
17
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:33 IST

तर आता प्रश्न असा निर्माण होतो की, विमानात इंधन (फ्यूल) टँक कुठे असतो आणि क्रॅश झाल्यानंतर विमानला आग कशी लागते? विमानाच्या कुठल्या भागात बसलेल्या प्रवाशांना सर्वाधिक धोका असतो? तर जाणून घेऊयात.

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानीनगर भागात ही दुर्घटना घडली. विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. यानंतर, लोकांना आकाशात आगीचे आणि धुराचे लोट दिसले. या विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून एकूण २४२ जण होते, अशी माहिती समोर येत आहे. सध्या अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. तर आता प्रश्न असा निर्माण होतो की, विमानात इंधन (फ्यूल) टँक कुठे असतो आणि क्रॅश झाल्यानंतर विमानला आग कशी लागते? विमानाच्या कुठल्या भागात बसलेल्या प्रवाशांना सर्वाधिक धोका असतो? तर जाणून घेऊयात.

कुठे असतं इंधन? -साधारणपणे विमानांचा वापर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी केला जातो. यामुळे विमानांना मोठ्या प्रमाणावर इंधनाची आवश्यकता असते. आता, विमानाच्या मुख्य बॉडीत इंधन साठवले जाते, असे आपल्याला वाटत असेल तर तसे नाही. विमानाच्या दोन्ही पंखांमध्ये इंधन साठवले जाते. याचेही एक कारण आहे. ते म्हणजे, विमानाचे इंजिन त्याच्या पंखांमध्येच लावलेले असते. यामुळे येथेच इंधनाची व्यवस्था केलेल्यास ते इंजिनपर्यंत पोहोचणे सोपे होते. यामुळे विमानाचे वजनही बरेच कमी होते. याशिवाय, 

बॅलेन्स राखण्यासही उपयुक्त - कोणत्याही प्रवासी विमानाचे पंख हे त्याचे संतुलन राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. कारण, जर इंधन विमानाच्या मुख्य भागात भरले, तर संतुलन बिघडेल. समजा इंधन मागच्या भागात भरले, तर हवेत असताना विमानाचा मागचा भाग खाली राहील, तर इंधन कमी झाल्यास, मागचा भाग वर येईल. यामुळे अपघातांचा धोका देखील वाढेल. तसेच अपघात झाल्यास, पंख्याजवळील प्रवाशांना सर्वाधिक धोका निर्माण होऊ शकतो... 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाGujaratगुजरातpassengerप्रवासी