शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:28 IST

राज्य सरकारने घेतलेल्या या नव्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश पेट्रोल पंपांना दिले आहेत.

नवी दिल्ली - वाढते प्रदुषण लक्षात घेता दिल्ली सरकारने जुन्या वाहनांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १ जुलैपासून End of Life वाहनांना टार्गेट करून त्यांच्याबाबत हे धोरण आखण्यात आले आहे. सरकारचा नवीन नियम तातडीने अंमलात येणार आहे. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेजर अधिकृतपणे जारी केले आहे. ज्यात पेट्रल पंपांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. 

काय आहे नियम?

या नव्या नियमानुसार, १५ वर्षापेक्षा जुनी पेट्रोल आणि सीएनजी वाहने, १० वर्षापेक्षा जुन्या डिझेल वाहनांना End of Life वाहने म्हणून नोंदवले जाणार आहे. म्हणजे या वाहनांचे आयुष्य संपले आहे. या वाहनांची ओळख पटवण्यासाठी दिल्लीच्या पेट्रोल पंपावर ऑटोमेटेड नंबर प्लेट रिकॉग्निशन सिस्टम लावली जाईल. अशा वाहनांना दिल्लीच्या कुठल्याही पंपावर पेट्रोल, डिझेल अथवा सीएनजी देण्यापासून बंदी आहे. पेट्रोल पंपावर येणाऱ्या जुन्या वाहनांची ओळख पटवण्यासाठी सिस्टम लावण्यात आली आहे. ज्यात कॅमेऱ्याच्या मदतीने नंबर प्लेटवर नजर ठेवली जाईल. 

राज्य सरकारने घेतलेल्या या नव्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश पेट्रोल पंपांना दिले आहेत. त्याशिवाय पेट्रोल पंपावर वाहन मालकांना सूचना देणारे बोर्डही लावले जातील. EOL वाहनांची नोंदणी करण्यासाठी पेट्रोल पंपावर अतिरिक्त स्टाफ उपलब्ध केला जाईल. याशिवाय पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी पेट्रोल पंप चालकांना इंधन नाकारण्यात आलेल्या सर्व प्रकरणांचा तपशीलवार लॉग ठेवावा लागेल.

नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

वाहतूक विभाग, इतर अंमलबजावणी संस्थांसह, या SOPs चे पालन होत आहे का यावर लक्ष ठेवेल. नियमांचे पालन न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. यामध्ये इंधन पंपांवर आढळणारी EOL वाहने जप्त करणे समाविष्ट आहे. शिवाय, जे पेट्रोल पंप मालक निर्धारित उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात अयशस्वी ठरतील किंवा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास नकार देतील त्यांना मोटार वाहन कायदा, १९८८ अंतर्गत दंड आकारला जाईल. सरकारची नवीन फ्यूल फॉर ओल्ड व्हेहिकल पॉलिसी रस्त्यावरील जुन्या वाहनांना हटवून प्रदूषण रोखण्यासाठी पाऊल उचलत आहे. दिल्लीतील हवा स्वच्छ राहावी. आरोग्यदायी वातावरण असावे यासाठी सरकारने हा नियम लागू केला आहे.

टॅग्स :delhiदिल्लीPetrolपेट्रोलDieselडिझेल