शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणीकृत करदात्यालाच जीएसटीमध्ये स्वातंत्र्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 01:05 IST

कृष्णा, १५ आॅगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य दिन आहे. क्रांतिकारकांनी लढा देऊन १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

सी. ए. उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, १५ आॅगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य दिन आहे. क्रांतिकारकांनी लढा देऊन १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. मागील महिन्यातच जीएसटी लागू झाला. तर या स्वातंत्र्य दिनानिमित्त जीएसटीबद्दल काय माहिती देणार आहेस?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, भारत देश आता स्वातंत्र्याच्या ७१व्या वर्षात पदार्पण करत आहे. या वर्षापासून भारताची आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. जीएसटी कायदा लागू झाल्यामुळे व्यवहारांमध्ये सुसूत्रता आली आहे. त्यामुळे कर संकलनातही वाढ झाली आहे. तर आज आपण करदात्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल माहिती घेऊ या.अर्जुन : कृष्णा, जीएसटीमुळे करदात्याला कोणकोणत्या करांतून मुक्तता मिळाली आहे ?कृष्ण : अर्जुना, जीएसटीमध्ये एकूण १७ केंद्रीय आणि राज्यीय कर कायदे एक झाले. त्यामुळे करदाता हा विक्री कर, मूल्यवर्धित कर, खरेदी कर, सेवा कर, अतिरिक्त सीमा शुल्क, विशेष अतिरिक्त सीमा शुल्क, केंद्रीय अधिभार व उपकर इत्यादी विविध करांमधून मुक्तता मिळाली आहे. सहज आणि सोप्या जीएसटीकडे आपण वाटचाल करत आहोत.अर्जुन : कृष्णा, जीएसटीमध्ये कोणकोणत्या करदात्याला स्वातंत्र्य आहे ?कृष्ण : अर्जुना, जीएसटीमध्ये जी व्यक्ती नोंदणीकृत आहे आणि जी कायद्याच्या तरतुदींचे पालन करेल, तिलाच व्यवसायात स्वातंत्र्य आहे, पण जी व्यक्ती अनोंदणीकृत आहे, तिचे स्वातंत्र्य हे आयटीसी, आरसीएम, इत्यादीमुळे जोखमीत आहे.अर्जुन : कृष्णा, लहान करदात्यांना जीएसटीमध्ये स्वातंत्र्य आहे का ?कृष्ण : होय अर्जुना, लहान करदाते म्हणजे ज्यांची वार्षिक उलाढाल २० लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांना नोंदणीचे स्वातंत्र्य दिले आहे. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीची वार्षिक उलाढाल २० लाखांपेक्षा कमी आहे, त्या व्यक्तीला नोंदणी करणे आवश्यक नाही किंवा ती व्यक्ती ऐच्छिक नोंदणी घेऊ शकते. म्हणजेच त्या व्यक्तीवर नोंदणीचे बंधन नाही.अर्जुन : कृष्णा, मध्यम करदात्यांना काय स्वातंत्र्य आहे?कृष्ण : अर्जुना, मध्यम करदाते म्हणजे ज्यांची वार्षिक उलाढाल ७५ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांनाही स्वातंत्र्य दिले आहे. जर एखाद्या व्यक्तीची वार्षिक उलाढाल ७५ लाखांपेक्षा कमी असेल, तर त्याला सामान्य नोंदणी किंवा कंपोझिशन स्कीमअंतर्गत नोंदणी करण्याचे स्वातंत्र्य आहे.>अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा ?कृष्ण : अर्जुना, जीएसटी लागू झाल्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य लाभेल. प्रत्येकाने जीएसटीच्या तरतुदींचे पालन केले, तर आर्थिक स्वातंत्र्याचे बळ लाभेल. बाजारातील काळा पैसा बाहेर येईल आणि व्यवहारांमधील पारदर्शकताही वाढेल. करदात्याने २० तारखेपर्यंत फॉर्म ३ बी आणि कराची रक्कम भरावी व ७० वा स्वातंत्र्य दिन साजरा करावा. जीएसटीमुळे नवीन प्रतिज्ञा जन्माला आली आहे. ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. अनोंदणीकृत बांधवांचे कर भरणे हे कर्तव्य आहे.’