शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

दिल्लीतील महिलांना उद्यापासून मोफत बसप्रवास, अरविंद केजरीवाल यांच्याकडून भाऊबीजेची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 18:02 IST

राजधानीतील महिलांना राज्य सरकारकडून भाऊबीजेला अपूर्व भेट मिळणार आहे.

नवी दिल्ली: राजधानीतील महिलांना राज्य सरकारकडून भाऊबीजेला अपूर्व भेट मिळणार आहे. उद्या (२९ आॅक्टोबर) भाऊबीजेपासून महिलांना दिल्ली परिवहन विभागाच्या (डीटीसी) बसमधून मोफत प्रवास करता येईल. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या निर्णयाची अधिसूचना भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला अधिसूचना प्रसिद्ध केली. दिल्लीतील लाखो महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. मोफत प्रवासामुळे स्वाभाविकपणे महिला प्रवाशांची संख्या वाढणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेसाठी १३ हजार मार्शल उद्यापासून तैनात केले जातील.जूनमध्ये घोषणा केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी उद्या होईल.  राज्य सरकारने तयारी पूर्ण केली आहे. प्रवासी महिलेस गुलाबी रंगाचे टोकन (तिकिट) दिले जाईल. मोफत प्रवास असताना तिकिट का, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला होता. प्रवाशांचा निश्चित आकडा कळण्यासाठी तिकिट देत असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले.मोफत प्रवास योजनेमुळे डीटीसीला १४० कोटी रूपयांचा तोटा होईल. तो भरून काढण्यासाठी राज्य सरकार १४० कोटी रूपयांचा अतिरिक्त निधी राज्य परिवहन विभागाला देणार आहे. महिला प्रवाशांना देण्यात येणाऱ्या एका गुलाबी रंगाच्या तिकिटाच्या बदल्यात प्रत्येकी दहा रूपये राज्य सरकारकडून डीटीसीला मिळतील.राजकीय लाभ घेण्यासाठी आम आदमी पक्षही सज्ज झाला आहे. घरोघरी मोफत प्रवासाचा प्रचार केला जाईल. बससोबत मेट्रोतूनही महिलांना मोफत प्रवासीच भेट देण्याची सरकारची योजना होती. परंतु केंद्र सरकारच्या आडकाठीमुळे शक्य झाले नाही, असाही प्रचार पक्ष करणार आहे. विधानसभा निवडणुकीला अवघे तीन महिने शिल्लक असताना अरविंद केजरीवाल यांनी प्रचारातही आघाडी उघडली आहे. दिल्लीतील अनधिकृत वस्त्या, अस्वच्छता, महिला असुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था, प्रदूषण, सीलिंगसारखे नागरी प्रश्न भीषण होत असताना भारतीय जनता पक्षाने अद्याप कलम ३७० च्या मुद्याचाच वापर आम आदमी पक्षाविरोधात केला आहे. त्यामुळे आता डीटीसी बसमधून मोफत प्रवास योजनेवर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. वैशिष्ट्ये भाऊबीजेपासून महिलांना मोफत प्रवासगुलाबी तिकिट मिळणारसकाळी व संध्याकाळी शिफ्टमध्ये बसमध्ये मार्शल असतील.१२ हजार ५०० मार्शल बसमधून प्रवास करतीलसह हजार सिविल डिफेन्स स्वयंसेवक. स्वयंसेवकांना प्रसिक्षण ३ हजारांपेक्षा जास्त गृहरक्षक दलाचे जवान तैनातराजकीय प्रचारासाठी आपची रणनिती

टॅग्स :delhiदिल्लीNew Delhiनवी दिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल