शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मनपाला पथदिव्यांसाठी मोफत एलईडी बल्ब एकनाथराव खडसे : घरगुती कार्यक्षम प्रकाशयोजनेचा शुभारंभ

By admin | Updated: November 4, 2015 23:27 IST

जळगाव : पथदिवे आणि सार्वजनिक दिवाबत्तीचे लाखो रुपयांचे विजबील थकित राहत असल्यामुळे मनपा, नगरपालिका व ग्रामपंचायती अडचणीमध्ये आहेत. वाढीव स्वरुपात येणारे वीज बिल कमी व्हावे तसेच वीजेची बचत व्हावी यासाठी जळगाव महानगरपालिकेला दत्तक घेऊन त्यांच्या हद्दीतील पथदिव्यांसाठी एलईडी दिव्यांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी घरगुती कार्यक्षम प्रकाशयोजनेच्या शुभारंभप्रसंगी दिली.

जळगाव : पथदिवे आणि सार्वजनिक दिवाबत्तीचे लाखो रुपयांचे विजबील थकित राहत असल्यामुळे मनपा, नगरपालिका व ग्रामपंचायती अडचणीमध्ये आहेत. वाढीव स्वरुपात येणारे वीज बिल कमी व्हावे तसेच वीजेची बचत व्हावी यासाठी जळगाव महानगरपालिकेला दत्तक घेऊन त्यांच्या हद्दीतील पथदिव्यांसाठी एलईडी दिव्यांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी घरगुती कार्यक्षम प्रकाशयोजनेच्या शुभारंभप्रसंगी दिली.
जिल्हा नियोजन भवनात बुधवारी सकाळी साडे दहा वाजता या योजनेचा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी जि.प.अध्यक्षा प्रयाग कोळी, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता अशोक पारधी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात जळगाव शहरातील प्रदीप रोटे, किशोर चौधरी, लिलाधर सोनवणे, कमलाकर पाटील, देवीदास पाटील या ग्राहकांना एलईडी बल्बचे वाटप करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
आपल्या भाषणात खडसे म्हणाले की, पर्यावरणाचे ढासळते संतुलन आणि वीजेचा होणारा अपव्यय ही मोठी समस्या आपल्या देशापुढे आहे. वीजेची बचत करण्यासाठी जिल्ह्यातील पाच लाख ग्राहकांना कमीत कमी २१ लाख ५० हजार एलईडी बल्बचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एलईडी बल्ब बसविल्यास वर्षभरात एका कुटुंबाची १६०० रुपयांची बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सर्वत्र हे बल्ब बसविल्यास काही दिवसात जळगाव जिल्हा भारनियमन मुक्त करता येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
बिलाचा ८० टक्के भार कमी होणार
सध्या जळगाव महानगरपालिकेवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. पथदिवे आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणार्‍या वीज दिव्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीजबिल मनपाला येत असते. त्यामुळे या योजनेतंर्गत जळगाव महानगरपालिकेला दत्तक घेऊन सर्व पथदिव्यावर एलईडी बल्ब बसविण्याची त्यांनी घोषणा केली. या बल्बच्या बदल्यात मनपाकडून एक रुपया घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे जळगाव महानगरपालिकेवरील वीज बिलाचा ८० टक्के भार हा कमी होणार आहे. महानगरपालिकेने केवळ देखभाल दुरुस्तीवर लक्ष द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.