शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना दरमहा एक हजार रुपये, मोफत वीज अन् शिक्षण; सुनीता केजरीवाल यांनी सांगितली 'आप'ची गॅरंटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 17:54 IST

Haryana Assembly Election : अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी हरियाणात निवडणुकीचा मोर्चा स्वीकारला आहे. त्यांनी शनिवारी हरियाणात एका जाहीर सभेला संबोधित केले. 

Haryana Assembly Election: चंदीगड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणात विविध पक्षांकडून अनेक दावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल हरियाणा दौऱ्यावर आहेत. 

शनिवारी सुनीता केजरीवाल यांनी हरियाणातील जनतेला आपच्या जाहीरनाम्यातील पाच गॅरंटी सांगितल्या. यामध्ये महिलांना दरमहा एक हजार रुपये, मोफत वीज, मोफत शिक्षण आणि इतर गॅरंटींबाबत घोषणा करण्यात आली.

हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी आपने प्रचाराला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी हरियाणात निवडणुकीचा मोर्चा स्वीकारला आहे. त्यांनी आज हरियाणात एका जाहीर सभेला संबोधित केले. 

यावेळी त्या म्हणाल्या की, जर आपने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला तर महिलांना दरमहा एक हजार रुपये दिले जातील. यासोबतच त्यांनी पाच मोठ्या गॅरंटीबाबत माहिती दिली.

१) मोफत वीजदिल्ली आणि पंजाबप्रमाणेच सर्व जुनी घरगुती बिलं माफ केली जातील. तसंच, वीज कपात बंद होईल. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे २४ तास वीज पुरवठा केला जाईल, असे सुनीता केजरीवाल यांनी सांगितले.

२) सर्वांसाठी चांगले आणि मोफत उपचारदिल्ली आणि पंजाबप्रमाणेच प्रत्येक गाव आणि शहरातील प्रत्येक परिसरात मोहल्ला क्लिनिक बांधलं जाईल. सर्व शासकीय रुग्णालयांना नवसंजीवनी दिली जाईल. नवीन सरकारी रुग्णालयं बांधली जातील. आजार किरकोळ असो वा मोठा, प्रत्येक नागरिकांसाठी संपूर्ण उपचार मोफत केले जातील. सर्व चाचण्या, औषधे, ऑपरेशन्स आणि उपचार सर्व मोफत असतील. यामुळे लोकांच्या पैशांची मोठी बचत होईल आणि महागाईपासून मोठा दिलासा मिळेल, असे सुनीता केजरीवाल म्हणाल्या.

३) उत्तम, उत्कृष्ट आणि मोफत शिक्षणदिल्ली आणि पंजाबप्रमाणे आम्ही शिक्षण माफिया संपवू. आम्ही सरकारी शाळा इतक्या चांगल्या बनवू की तुम्ही तुमच्या मुलांना खाजगी शाळांमधून काढून सरकारी शाळेत दाखल कराल. खासगी शाळांची गुंडगिरीही आम्ही थांबवू, खासगी शाळांना बेकायदेशीर फी वाढवण्यापासून रोखू, असे सुनीता केजरीवाल यांनी म्हटले आहे.

४) महिलांना दरमहा एक हजार रुपयेसर्व माता भगिनींना दरमहा एक हजार रुपये दिले जातील, असेही सुनीता केजरीवाल यांनी आश्वासन दिले आहे.

५) प्रत्येक तरुणाला रोजगारयाचबरोबर, प्रत्येक बेरोजगार तरुणाला रोजगाराची व्यवस्था करणार असल्याचे सुनीता केजरीवाल यांनी सांगितले.

टॅग्स :HaryanaहरयाणाAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टी