चैतन्य विद्यालयात मोफत गणवेशवाटप
By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST
ओतूर : येथील चैतन्य विद्यालयातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेशवाटप करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक शिवाजी अस्वार व प्रसिद्ध विभागप्रमुख भाऊसाहेब खाडे यांनी दिली. अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ शिक्षकनेते सुदाम गोविंदराव ढमाले होते. ओतूरचे ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त शिक्षक विस्तार अधिकारी रा. ज्ञा. डुंबरे यांनी त्यांच्या मातोश्री हौसाबाई डुंबरे यांच्या स्मरणार्थ व विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक आर. एस. पी.चे तालुका समन्वयक राजाराम शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश दिले.
चैतन्य विद्यालयात मोफत गणवेशवाटप
ओतूर : येथील चैतन्य विद्यालयातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेशवाटप करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक शिवाजी अस्वार व प्रसिद्ध विभागप्रमुख भाऊसाहेब खाडे यांनी दिली. अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ शिक्षकनेते सुदाम गोविंदराव ढमाले होते. ओतूरचे ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त शिक्षक विस्तार अधिकारी रा. ज्ञा. डुंबरे यांनी त्यांच्या मातोश्री हौसाबाई डुंबरे यांच्या स्मरणार्थ व विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक आर. एस. पी.चे तालुका समन्वयक राजाराम शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश दिले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स. गो. ढमाले यांनी या विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी २१०० रुपयांची मदत केली.या कार्यक्रमासाठी ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकरकाका तांबे, सचिव प्रदीप गाढवे, मुख्याध्यापक शिवाजी अस्वार, पी. जे. शिंदे, पर्यवेक्षक दिनकर दराडे, विश्वनाथ लव्हारे, विलास सुतार, शामराव चौधरी, बी. आर. खाडे, पंकज घोलप, दशरथ भाईक, डी. वाय. सोनवणे, मिलिंद खेत्री, लक्ष्मण दुडे, विशाल चौधरी, संतोष कांबळे आदी शिक्षक उपस्थित होते.०००००