शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रेशनकार्ड बनवण्याच्या कंत्राटाचे आमिष दाखवून फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 05:32 IST

‘एक देश एक रेशन कार्ड’ च्या आडून होत असलेली फसवणूक उघडकीस आली आहे.

नितीन अग्रवालनवी दिल्ली : ‘एक देश एक रेशन कार्ड’ च्या आडून होत असलेली फसवणूक उघडकीस आली आहे. महाराष्ट्रातील दोघांनी केलेल्या तक्रारीनंतर ग्राहक कामकाज खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने दिल्ली पोलिसांनी दोघांना अटक केली. हे दोघे रेशन कार्ड बनवण्याचे कंत्राट देण्याचे आश्वासन देऊन लोकांना लुबाडत होते.दानवे यांनी सांगितले की, एक देश एक रेशन कार्ड योजनेच्या नावावर नवी रेशनकार्डस छापण्याचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाने ही फसवणूक सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळत होती. महाराष्ट्रातील दोघांनी मला भेटून याची माहिती दिली होती. या दोघांनी सांगितले की, रांचीच्या पाच लोकांनी असे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून दहा लाख रूपये उकळले. दानवे यांनी दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली व कठोर कारवाईचा आदेशही.दिल्लीचे उप पोलीस आयुक्त ईश सिंघल यांनी सांगितले की, तक्रारदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन लबाडांना (दोघेही रा. रांची, झारखंड) कॅनॉट प्लेसमध्ये कॉफी हाऊसमधून अटक केली. त्यांच्या इतर तीन साथीदारांना पकडायचे आहे. पकडलेल्या दोघांकडील मंत्रालयाचे बनावट दस्तावेजही जप्त केले गेले. तक्रारदारांना नवे रेशनकार्ड बनवण्याचे कंत्राट देण्यासाठी या लोकांनी १५ लाख रूपये ठरवले होते. त्यातील मोठी रक्कम दिली गेली. परंतु, तक्रारदारांना संशय आल्यावर ते रांचीला येऊन पोलिसांकडे तक्रार केली.मंत्री दानवे यांनी सांगितले की, लोकांच्या सोयीसाठी ही ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजना आहे. लबाड लोकांनी ग्राहक कामकाज मंत्री रामविलास पासवान आणि रावसाहेब दानवे यांची नावे व बनावट सह्या करून काही कागदपत्रे तयार केली. याची माहिती दिल्ली पोलिसांना गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिली होती.मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ ला सांगितले की, एक देश एक रेशन कार्ड योजना सगळ््यात आधी महाराष्ट्र व गुजरातमध्ये यशस्वीपणे लागू केली गेली. त्यानंतर आंध्र प्रदेश व तेलंगणमध्ये तिचा विस्तार केला गेला. येत्या जूनपर्यंत ती २० राज्यांत लागू केली जाईल. त्यात दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, दादरा नगर हवेली, गोवा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसारखी राज्येही समाविष्ट होऊ शकतात. योजनेअंतर्गत आधारशी जोडलेल्या रेशनकार्डवर कोणत्याही रेशन दुकानातून रेशनघेता येईल.