शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लष्करात चार वर्षांची नाेकरी, ४० हजार वेतन; अग्निपथ योजनेची घोषणा; सैनिकांप्रमाणे लाभ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 05:46 IST

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची घोषणा केली.

नवी दिल्ली :

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची घोषणा केली. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. त्यांना अग्निवीर संबोधण्यात येणार आहे. त्यांना चार वर्षे लष्करात सेवा करता येईल. सुरक्षा विषयाच्या मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीएस) बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  नौदलाचे प्रमुख एडमिरल आर. हरीकुमार म्हणाले की, या योजनेमुळे सशस्त्र दलाची ताकद वाढेल. या योजनेची घोषणा तिन्ही दलांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. पूर्ण देशात भरती आयोजित करण्यात येणार आहे.काय आहेत 'अग्निपथ'ची वैशिष्ट्ये?>> ४६,००० सैनिकांची यावर्षी तीनही दलात भरती>> ४४ लाख रुपये सेवेत असताना विकलांग झाल्यास देणार, याशिवाय शिल्लक नोकरीचे वेतनही दिले जाईल.>> ११.७१ लाख रुपये प्रत्येक अग्निवीराला मिळणार>> २५% अग्निविरांना मेरिटच्या आधारावर नियमित कॅडरमध्ये समाविष्ट करणारवेतन किती? पहिले वर्ष >> ₹३०,०००दुसरे वर्ष >>  ₹३३,०००तिसरे वर्ष >> ₹३६,५००चौथे वर्ष >> ₹४०,००० 

कुणाला मिळू शकेल लाभ?>> १७.५ ते २१ वर्षांचे तरुण  पहिली भरती रॅली ९० दिवसात दहावी, बारावी उत्तीर्ण आवश्यक

सैन्यदलात दहा वर्षांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशननुसार तरुणांची भरती करण्यात येते. हा काळ १४ वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. वेतन व पेन्शन खर्च घटवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. 

अग्निपथ योजनेचा उद्देश सशस्त्र दलातील भरतीमध्ये परिवर्तन आणणे, हा आहे. या योजनेमुळे सैन्यात युवा ताकद आणि अनुभव यांचे संतुलन राखण्यास मदत होईल. सैनिकांची भरती चार वर्षांसाठी होईल. मात्र, त्यातील काही जणांना सेवेत ठेवले जाईल.- जनरल मनोज पांडे, सैन्य दलाचे प्रमुख

या माध्यमातून भारतीय तरुणांना सशस्त्र दलांमध्ये अग्निवीर म्हणून सेवा देण्याची संधी मिळणार आहे. हा एक क्रांतिकारी उपक्रम आहे. सशस्त्र दलाला या माध्यमातून युवा चेहरा मिळणार आहे.- राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान