शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहीद वडिलांच्या अंत्यसंस्काराला चिमुकला गाऊ लागला 'गोल-गोल रानी..', अनेकांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 08:43 IST

रविवारी एका चार वर्षांच्या चिमुकल्याच्या मुखातून जेव्हा उपस्थितांनी हे गाणं ऐकलं, तेव्हा त्यांच्या अश्रूंचा बांधच फुटला.

ठळक मुद्देशाळेत शिकवत असल्यानं लहानग्यांना 'गोल-गोल रानी, इत्ता--इत्ता पानी..' अशी गाणी म्हणण्यास फार आवडतात. रविवारी एका चार वर्षांच्या चिमुकल्याच्या मुखातून जेव्हा उपस्थितांनी हे गाणं ऐकलं, तेव्हा त्यांच्या अश्रूंचा बांधच फुटला.छत्तीसगडच्या सशस्त्र बला(CAF) चे जवान उपेंद्र साहू नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले. त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

जगदलपूरः शाळेत शिकवत असल्यानं लहानग्यांना 'गोल-गोल रानी, इत्ता--इत्ता पानी..' अशी गाणी म्हणण्यास फार आवडतात. कधी ना कधी ही गाणी आपल्याला लहानपणीच्या आठवणीतही घेऊन जातात. रविवारी एका चार वर्षांच्या चिमुकल्याच्या मुखातून जेव्हा उपस्थितांनी हे गाणं ऐकलं, तेव्हा त्यांच्या अश्रूंचा बांधच फुटला. छत्तीसगडच्या सशस्त्र बला(CAF) चे जवान उपेंद्र साहू नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले. त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करत असताना वडिलांना पाहून तो चार वर्षांचा चिमुकला 'गोल-गोल रानी, इत्ता--इत्ता पानी..' असं गाणं गाऊ लागल्यानंतर शेकडो लोकांना अश्रू अनावर झाले. बस्तरमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात छत्तीसगड सशस्त्र बलाचे दोन जवान शहीद झाले. यातील उपेंद्र साहू यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शहिदाचं पार्थिव घराजवळच असलेल्या नदीच्या किनारी ठेवण्यात आलं होतं. शहीद झालेल्या जवानाला चार वर्षांचा एक मुलगासुद्धा आहे.शहीद जवानाच्या पार्थिव शरीराला खांदा देऊन इंद्रावती नदीच्या पुलाच्या किनारी आणण्यात आलं. त्यानंतर शहिदाच्या पार्थिवाभोवती पुष्पचक्र परिक्रमेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे शहिदाला पुन्हा एकदा गार्ड ऑफ ऑनर देण्यात  आलं आहे. शहिदाचा मुलगा लकीला वाटलं कोणता तरी खेळ सुरू आहे. नातेवाईकांच्या खुशीत तो 'गोल-गोल रानी, इत्ता--इत्ता पानी..' हे गाणं गाऊ लागला. त्या चिमुकल्याला हे गाणं गाताना पाहून शहिदाला निरोप देण्यासाठी आलेल्या शेकडो उपस्थितांना अश्रू अनावर झाले.   

टॅग्स :MartyrशहीदChhattisgarhछत्तीसगड