शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अंजू, सीमा हैदरच्या चार पाऊल पुढे; 'रोजी'च्या प्रेमात सरवन बनला मौलवी साहिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 09:41 IST

सिवानच्या मैरवा बाजार येथील हा प्रकार आहे. माहितीनुसार, सरवनचे वडील प्रदीप चौहान गोपालगंज जिल्ह्यातील हरपूर गावातून ९ वर्षापूर्वी मुलांच्या शिक्षणासाठी सिवानला येऊन राहायला लागले.

सिवान – बिहारच्या सिवान इथं एका मुलाने प्रेयसीसाठी धर्म बदलून सरवन चौहानचा साहिल अली बनला आहे. इतकेच नाही तर त्याने स्वत:चा लूकही बदलला आहे. सध्या तो एका मदरशात मौलवी बनला आहे. सरवनचा नवा लूक जेव्हा त्याच्या प्रेयसीने सर्वांना दाखवला तेव्हा सर्वच हैराण झाले. पाहता पाहता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रेयसीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून सरवनला फसवलं असा आरोप त्याचे नातेवाईक करतात. आता हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले आहे.

सिवानच्या मैरवा बाजार येथील हा प्रकार आहे. माहितीनुसार, सरवनचे वडील प्रदीप चौहान गोपालगंज जिल्ह्यातील हरपूर गावातून ९ वर्षापूर्वी मुलांच्या शिक्षणासाठी सिवानला येऊन राहायला लागले. सरवन हा ३ भावंडांमध्ये सर्वात मोठा आहे. मैरवा इथं एका दुकानावर तो काम करायचा. ३-४ वर्षापूर्वी त्याच परिसरातील रोजी नावाच्या मुलीसोबत त्याची ओळख झाली. हळूहळू त्यांच्या ओळखीचं प्रेमात रुपांतर झाले. सरवनला रोजीसोबत लग्न करून आयुष्य घालवायचे होते. परंतु रोजी आणि सरवन यांच्या धर्माची भिंत उभी होती. त्यामुळे रोजीच्या प्रेमाखातीर सरवन साहिल अली बनला.

कुटुंबाचा प्रेयसी रोजीवर आरोप

आई नैनादेवी म्हणाली की, सरवनला धर्म परिवर्तन करून त्याच्या प्रेयसीने गायब केले. रोजी खातून या मुलीने सरवनला प्रेमाच्या जाळ्यात ओढत ७ महिन्यापूर्वी पळवून नेले. त्यानंतर धर्मपरिवर्तन करून त्याला मौलाना बनवले. त्यानंतर एका मदरशात त्याला ठेवले. रोजीनेच मुलाचा मौलाना बनलेला फोटो परिसरात व्हायरल केला. आता सरवनच्या आईने मुलाला परत आणण्यासाठी प्रशासनाकडे मदतीची याचना केली आहे.

या प्रकरणात रोजी खातूनने सरवन केवळ आपला मित्र होता. त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हते. सरवन अल्पवयीन नाही. त्याला आयुष्यात काय करायचे आणि काय नाही याची समज आहे. तो त्याच्या आईच्या मर्जीनेच लग्न करेल असं रोजीनं म्हटलं. सरवन चौहानने नाव बदलून साहिल अली केले आहे. त्याबाबत प्रतिज्ञापत्र बनवून आधार कार्डवरील नावही बदलले आहे. या प्रकरणी आता सरवनने उर्फ साहिलने एक व्हिडिओ जारी केला. ज्यात स्वत:च्या मर्जीने धर्मपरिवर्तन केल्याचे सांगितले आहे. सध्या या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :Muslimमुस्लीम