शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

पश्चिम बंगाल वगळता चार राज्यांमध्ये सत्तांतराचे संकेत

By admin | Updated: May 17, 2016 05:15 IST

विधानसभा निवडणुकांमधील मतदानाचा अंक सोमवारी पार पडताच मतदानोत्तर सर्वेक्षणाचा (एक्झिट पोल) अंदाज बाहेर आला आहे

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली-संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या विधानसभा निवडणुकांमधील मतदानाचा अंक सोमवारी पार पडताच मतदानोत्तर सर्वेक्षणाचा (एक्झिट पोल) अंदाज बाहेर आला आहे. विविध सर्वेक्षण संस्था आणि टीव्ही वाहिन्यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार आसाममध्ये पहिल्यांदाच कमळ फुलणार असून, ममता बॅनर्जी प. बंगालचा गड कायम राखणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. तामिळनाडूत जयललिता यांची सत्ता उलथवत द्रमुक-काँग्रेसची युती सत्तेवर येऊ शकते. काँग्रेसला या राज्यासोबतच पुडुच्चेरीमध्येही दिलासा मिळणार आहे. केरळमध्ये मात्र या पक्षाला सत्ता गमवावी लागेल. माकपच्या नेतृत्वातील डावी आघाडी तेथे बाजी मारेल. दिल्ली आणि बिहारमध्ये पानिपत अनुभवणाऱ्या भाजपावर अखेर देव प्रसन्न झाल्याचे आसाममधील मोठ्या विजयाने दिसून येईल. अमित शहा यांच्या नेतृत्वात या पक्षाला पराभवाचे लागोपाठ हादरे बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा-अरुण जेटली या त्रयींसाठी आसाममधील विजय हा मोठी शक्ती देणारा ठरेल. पहिल्यांदा हेमंत विश्व सरमा यांना आपल्या दावणीला आणत आणि नंतर आगप आणि बीपीएफशी आघाडी करीत या पक्षाने विजयासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती. ‘वीक विकेट’ बनलेल्या काँग्रेसला १५ वर्षांनंतर या राज्यातील सत्ता गमवावी लागेल. मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना मुक्तपणे निर्णय घेण्याला वाव देण्याचे धाडसही काँग्रेसच्या नेतृत्वाला दाखवता आले नाही.>अंदाज खरे ठरल्यास भाजपाला फायदाडाव्यांसोबत आघाडी करणाऱ्या काँग्रेसला प. बंगालमध्ये दुसरा हादरा बसणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसकडेच सत्ता राहणार, याबाबत सर्वच एक्झिट पोलमध्ये एकवाक्यता दिसून येत आहे. एका वाहिनीने तृणमूलला २९४पैकी १६३ तर दुसऱ्या पोलस्टरने या पक्षाच्या झोळीत चक्क २५३ जागा टाकल्या आहेत. तसे घडल्यास डावे-काँग्रेस आघाडीच्या वाट्याला मानहानीजनक पराभव आलेला असेल.माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासाठीही हा पराभव अडचणीचा ठरू शकतो. त्यांना केरळचाच काय तो दिलासा मिळेल; मात्र या राज्यात तीन सर्वेक्षण संस्थांनी डाव्या आघाडीचा निसटता विजय तर एकाने पुन्हा काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफच्या हाती सोपविली आहे. अंदाज खरे ठरले तर भाजपाच्या पदरी लाभच पडलेला असेल. >दोन पक्षांची मोट कायम राहण्याची शक्यतापुडुच्चेरीतील विजय आणि तामिळनाडूतील द्रमुकसोबतची भागीदारी ही काँग्रेससाठी आनंदाची बाब मानली जाईल. केरळमधील विजय डाव्या आघाडीच्या पथ्यावर पडेल. २०११मध्ये प. बंगालमध्ये पराभूत होऊनही या पक्षाने काँग्रेससोबत आघाडीचा प्रयोग कायम ठेवला. या वेळीही त्यात अपयश आले तरी येत्या काही महिन्यांत आणि वर्षांत या दोन पक्षांची मोट कायम राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.