कोलकाता : जीवाला धोका आहे हे माहीत असूनही अनेकांना सेल्फीचा मोफ आवरता येत नाही. असाच प्रकार गुरुवारी ट्रेनमधून सेल्फी काढण्याच्या नादात घडला. त्यात चौघांचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या हावडा परिसरात ही घटना घडली. चार मित्रांसोबत रेल्वेने प्रवास करणाऱ्या तारकनाथ मकाल नावाच्या तरुणाला दरवाजापाशी लटकून साहसी सेल्फी काढण्याचा मोह झाला. सेल्फीचा प्रयत्न करताना तो ट्रेनमधून खाली पडला. त्याला वाचवण्यासाठी मित्रांनी ट्रेनमधून उडी मारली. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेल्वेखाली येऊन त्या चौघांचा मृत्यू झाला. सुमित कुमार, संजीव पॉली, काजल सहा आणि चंदन पॉली य्अशी त्यांची नावे असून, तारकनाथला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तारकेश्वर येथील मंदिरात दर्शन घेऊन हे पाचही मित्र घरी परतत होते.
सेल्फीच्या नादात चौघांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू
By admin | Updated: April 15, 2017 01:17 IST