शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
3
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
4
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
5
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
6
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
7
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
9
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
10
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
11
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
12
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
13
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
14
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
15
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
16
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
17
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
18
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
19
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
20
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले

बलसागर भारत होवो! भारतात आणखी ४ राफेल विमानं दाखल; पहिली स्क्वॉड्रन पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 10:55 IST

four more rafale aircraft arrive in india from france: देशात आतापर्यंत १८ राफेल विमानं दाखल; हवाई दलाच्या अंबाला तळावर तैनात

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलात आणखी चार राफेल विमानांचा समावेश झाला आहे. काल रात्री ११ वाजून मिनिटांनी ४ राफेल विमानं भारतात दाखल झाली. फ्रान्समधून उड्डाण केलेल्या राफेल विमानांनी सलग आठ हजार किलोमीटरचं अंतर कापलं. फ्रान्सच्या हवाई दलानं आणि यूएईनं राफेल विमानात हवेतच इंधन भरण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. (four more rafale aircraft arrive in india from france)बुधवारी फ्रान्सच्या मॅरिग्नेक बॉरडॉक्स विमानतळावरून ४ राफेल विमानांनी उड्डाण केलं. हवाई दलाचे प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी विमानांना हिरवा कंदिल दाखवला. राफेल विमानांची पाचवी खेप भारतात दाखल झाली आहे. त्यामुळे देशात दाखल झालेल्या विमानांची संख्या १८ वर पोहोचली आहे. त्यामुळे आता भारतीय हवाई दलाकडे राफेलची एक स्क्वाड्रन पूर्ण झाली आहे.राफेल विमानांची एक स्क्वाड्रन अंबाला हवाई तळावर तैनात करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाला राफेल विमानांची आणखी एक एक स्क्वाड्रन मिळणार आहे. ती पश्चिम बंगालमधील हाशिमारा हवाई तळावर तैनात केली जाईल. भारतीय हवाई दलाचे प्रमुख भदौरिया सोमवारपासून फ्रान्स दौऱ्यावर आहेत. फ्रान्सकडून भारताला पाठवण्यात येणाऱ्या विमानांच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी भदौरिया फ्रान्सला गेले आहेत.

टॅग्स :Rafale Dealराफेल डील