शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 15:46 IST

हे चार दहशतवादी अहमदाबादमध्ये येत असल्याची माहिती मिळाली होती. केंद्रीय एजन्सीने हे इनपुट गुजरात एटीएसला शेअर केले होते की इस्लामिक स्टेटशी संबंधित हे दहशतवादी विमानतळावर आले होते. हे सर्व दहशतवादी श्रीलंकेतील असल्याचे सांगण्यात येत आहे.

गुजरातमधील अहमदाबादमध्ये इस्लामिक स्टेटच्या ४ दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. गुजरात एटीएसने चारही दहशतवाद्यांना अहमदाबाद विमानतळावरून अटक केली आहे. या दहशतवाद्यांची ओळख अद्याप समोर आलेली नाही. मात्र, हे चारही दहशतवादी इस्लामिक स्टेटशी संबंधित असून त्यांचे श्रीलंकन ​​कनेक्शनही समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार

मिळालेल्या माहितीनुसार, हे चार दहशतवादी अहमदाबादमध्ये येत असल्याची माहिती मिळाली होती. केंद्रीय एजन्सीने हे इनपुट गुजरात एटीएसला शेअर केले होते की इस्लामिक स्टेटशी संबंधित हे दहशतवादी विमानतळावर आले होते. हे सर्व दहशतवादी श्रीलंकेतील असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या गुजरात एटीएसने चारही दहशतवाद्यांची चौकशी सुरू केली आहे. अहमदाबाद विमानतळावर दहशतवादी कोणत्या उद्देशाने आले होते, याची माहिती मिळालेली नाही. त्यांच्याकडून मिळालेल्या तिकिटांच्या आधारे ते चेन्नईहून आल्याचे  सांगण्यात येत आहे . इस्लामिक स्टेटचे हे दहशतवादी कोलंबोहून तामिळनाडूत आणि तामिळनाडूतून अहमदाबादमध्ये आले आहेत.