रांची : झारखंडमधील पालमू जिल्ह्यातील लोर्इंगा या गावी गोवर व मेंदूज्वर (जपानीज एन्सेफलायटिस) या आजारांवरील लस दिल्यानंतर रविवारी चार बालकांचा मृत्यू झाला. आणखी चार बालकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री रघुवर दास यांनी दिले आहेत.मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.या दोन आजारांवरील लस ११ बालकांना शनिवारी दुपारी लोईंगा गावातील अंगणवाडीत द्रौपदी पांडे या नर्सने दिली होती. त्यानंतर या मुलांना ताप आला तसेच जुलाब व उलट्या होऊ लागल्या. पण शनिवारी रात्री या आठ जणांची प्रकृती आणखी बिघडली. या प्रकरणाची माहिती मिळताच नर्स व ब्लॉक डेव्हलपमेंट आॅफिसर हे दोघे लोईंगा गावात गेले असता गावकऱ्यांनी त्यांना पकडले व पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. (वृत्तसंस्था)
गोवर, मेंदूज्वर लस दिल्याने चार बालकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 04:09 IST