नाशिक : दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्या पाच पैकी चौघांना अटक करण्याची कामगिरी पंचवटी पोलिसांनी काल केली़ यामध्ये राजू विलास हुडके (वय २५, रा़ फु लेनगर), राजू रामसिंग राजपूत (वय ३२ रा़ तेलंगवाडी, पेठ रोड), संतोष कारभारी शेळके (वय २२, रा़ अवधूतवाडी, गजानन चौक) व गणेश तानाजी दातीर (वय १९, रा़ लालबावटा चौक, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत, तर त्यांचा एक साथिदार पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हे पाच जण रासबिहारी-मेरी लिंक रोडवरील राजमाता मंगल कार्यालयाच्या बाजूला संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे पंचवटी पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाला आढळून आले़ गस्ती पथकाने त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांनी उडावाउडवीची उत्तरे दिली़ यामुळे पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन कोयते, नायलॉनची दोरी, मीरची पूड असे दरोडा टाकण्याचे साहित्य आढळून आले़ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत असताना एक संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला़ त्याचा शोध पंचवटी पोलीस घेत आहेत़
दरोड्याच्या तयारीतील चौघांना अटक
By admin | Updated: January 9, 2015 00:22 IST