शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

सापडला अंगठीच्या आकाराचा हायड्रोजनचा वायुमेघ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 04:55 IST

आकाशगंगेच्या चौपट व्यास; दोन मराठी शास्त्रज्ञांचे संशोधन

पुणे : राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील (एनसीआरए) खगोलशास्त्रज्ञांनी नव्या दीर्घिकेचा (गॅलरी) शोध लावला असून, या दीर्घिकेभोवती हायड्रोजन वायूचा अंगठीच्या आकाराचा गोलाकार वायुमेघ आहे. जायंट मीटरवेव रेडिओ टेलिस्कोप वापरून शास्त्रज्ञांनी हा वायुमेघ शोधला असून, त्याच्या आतील दीर्घिका पृथ्वीपासून २६० दशलक्ष प्रकाशवर्षे दूर आहे.या वायुमेघाचा व्यास आपल्या आकाशगंगेच्या चौपट असून, अशा प्रकारच्या वायुमेघाचा शोध १९८७ मध्ये लागला होता. मात्र, तो पृथ्वीपासून सुमारे १३० दशलक्ष प्रकाशवर्षे दूर होता. परंतु एनसीआरएमधील शास्त्रज्ञ ओम्कार बाईत आणि प्रा. योगेश वाडदेकर यांनी आता नव्या दीर्घिकेचा शोध लावला आहे. हे संशोधन मंथली नोटीस रॉयल अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. शास्त्रज्ञांकडून अशा नऊ दीर्घिकांचा अभ्यास केला जाणार आहे.योगेश वाडदेकर म्हणाले, अशा प्रकारच्या वायुमेघाची निर्मिती नेमकी कशी झाली, हे कोडे आहे. सूर्यमालेशी त्याची तुलना करता येत नाही, कारण वायुमेघाचे वस्तुमान सूर्याच्या दोन अब्जपट आहे. सूर्यमालेचा व्यास काही प्रकाश तास आहे, तर या वायुमेघाचा व्यास ३ लाख ८० हजार प्रकाश वर्ष आहे.अणुरूपी हायड्रोजन सुमारे २ सेमीच्या तरंगलांबीवर रेडिओ लहरी उत्सर्जित करतो. रेडिओ खगोलशास्त्रज्ञांना हायड्रोजन अणूंच्या किरणोत्सर्गामुळे आपल्या आकाशगंगेमध्ये व जवळील दीर्घिकांमध्ये हायड्रोजन वायूचे प्रमाण व वितरण यांचा नकाशा तयार करता येतो. हायड्रोजनचा मोठा साठा सक्रियपणे तारे निर्माण करणाऱ्या दीर्घिकांमध्ये आढळतो. या नव्या दीर्घिकेमध्ये तारे तयार होण्याची चिन्हे दिसत नाहीत. परंतु, त्यात मोठ्या प्रमाणावर हायड्रोजन दिसत आहे.खगोलशास्त्रज्ञांपुढे आव्हानजीएमआरटीच्या निरीक्षणातून हायड्रोजनचा विस्तार मोठ्या आॅफ-सेंटर रिंगच्या स्वरूपात असल्याचे निष्पन्न झाले. त्या रिंगच्या जवळ नवीन तारे असल्याची चिन्हे दिसत नाहीत. एनसीआरएच्या शास्त्रज्ञांनी डुक व कुइयान्द्र या शास्त्रज्ञांच्या सहकार्याने अतिशय संवेदनशील आॅप्टिकल प्रतिमा कॅनडा व फ्रान्स हवाई टेलिस्कोप वापरून मिळविली आहे. या नव्या दीर्र्घिकेमध्ये तारे दिसत नसल्याने हे कसे घडले, हे शोधण्याचे आव्हान खगोलशास्त्रज्ञांपुढे आहे. - ओम्कार बाईत