अलाहाबाद : महाराष्ट्र व गोव्याचे माजी राज्यपाल आणि अर्थतज्ज्ञ मोहम्मद फजल यांचे गुरुवारी पहाटे राहत्या घरी निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले व मुली आहेत.
मोहम्मद फजल 1999 मध्ये गोव्याचे तर 2क्क्2 ते 2क्क्4 दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
धाकटे चिरंजीव कैसर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षापासून फजल यांची स्मरणशक्ती क्षीण झाली होती व गेल्या काही दिवसांपासून त्यांना निम्न रक्तदाबासह छातीत रक्तसंचयाचीही तक्रार जाणवत होती.अबू बकरपूर निवासस्थानी रात्री दीडच्या सुमारास श्वसनमार्गात अडथळे उत्पन्न झाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गुरुवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार केले गेले. 2 जुलै 1922 रोजी जन्मलेल्या मोहम्मद फजल यांनी अलाहाबाद विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व लंडन विद्यापीठातून शिक्षण घेतले होते. आपल्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. 198क्-85 दरम्यान ते नियोजन आयोगाचे वरिष्ठ सदस्य होते. (वृत्तंसस्था)
4नवी दिल्ली : पंतप्रधानांनी मोहम्मद फजल यांच्या निधनाबद्दल शोक संवेदना व्यक्त केल्या.
मार्गदर्शक गमावला
4मोहम्मद फजल यांच्या निधनाने तीव्र दु:ख झाले. महाराष्ट्राच्या मागास भागांचा विकास, उच्चशिक्षणाची दर्जावाढ यावर त्यांनी लक्ष दिले होते. त्यांच्या निधनाने मी एक सच्चा मार्गदर्शक गमावला आहे.
- सी. विद्यासागर राव, राज्यपाल.
देश अर्थतज्ज्ञाला मुकला
4मोहम्मद फजल यांच्या निधनाने एक निष्णात अर्थतज्ज्ञ आणि प्रशासनातील जाणते व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
- पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री