नवी दिल्ली: हार्वर्ड विद्यापीठातील नोकरीच्या नावाखाली एनडीटीव्हीच्या माजी पत्रकार निधी राजदान यांची फसवणूक झाली आहे. निधी यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. मी एका मोठ्या फिशिंग हल्ल्याची बळी ठरले आहे, असं निधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगताना यावर मी पुढे कधीही बोलणार नाही, असंदेखील निधी यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.हार्वर्ड विद्यापीठात एसोसिएट प्रोफेसर म्हणून संधी मिळत असल्यानं निधी राजदान यांनी जून २०२० मध्ये एनडीटीव्हीमधील नोकरीचा राजीनामा दिला. त्या २१ वर्षे एनडीटीव्हीमध्ये कार्यरत होत्या. निधी राजदान यांनी फसवणुकीसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. 'सप्टेंबर २०२० मध्ये हार्वर्डमधील अध्यापनकार्य सुरू होईल, असं मला सांगण्यात आलं होतं. त्यानंतर कोरोनामुळे जानेवारी २०२१ पासून वर्ग सुरू होतील, असं सांगितलं गेलं,' अशी माहिती राजदान यांनी दिली आहे.
हार्वर्ड विद्यापीठाच्या ऑफरच्या नावाखाली NDTVच्या माजी पत्रकार निधी राजदान यांची फसवणूक
By कुणाल गवाणकर | Updated: January 15, 2021 20:17 IST