शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 06:37 IST

भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं रविवारी रात्री निधन झालं.

नवी दिल्लीः  आदर्श निवडणूक आचार संहिता कठोरपणे राबवून निवडणूक सुधारणांसह भारतीय निवडणूक आयोगाला नवीन चेहरा देणारे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं रविवारी रात्री निधन झालं. भारताचे 10वे मुख्य निवडणूक आयुक्त राहिलेल्या टी. एन. शेषन यांनी वयाच्या 86व्या वर्षी चेन्नईतल्या निवासस्थानी रात्री 9.30 वाजताच्यादरम्यान अखेरचा श्वास घेतला. भारताच्या निवडणूक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्याचं श्रेय टी .एन. शेषन यांना दिलं जातं. 

शेषन हे वर्ष 1990 ते 1996पर्यंत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. मुख्य निवडणूक आयुक्त होण्यापूर्वी त्यांनी 1989मध्ये भारताच्या 18व्या कॅबिनेट सचिवपदाचा पदभार सांभाळला होता. 1996मध्ये त्यांनी सरकारी सेवेत दिलेल्या विशेष योगदानामुळे त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. मतदार ओळखपत्राची सुरुवातही त्यांनी केली होती. त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.त्यांचे पूर्ण नांव तिरुनेल्लई नारायण अय्यर शेषन (टी. एन. शेषन) होते. तामिळनाडूच्या 1955च्या तुकडीतील ते आयएएस अधिकारी होते. ते भारताचे दहावे मुख्य निवडणूक आयुक्त होते. वाढत्या वयामुळे ते काही वर्षांपासून घरातच राहत होते. त्यांनी 1997मध्ये के. आर. नारायण यांच्याविरुद्ध राष्ट्रपतीपदाची आणि त्यानंतर दोन वर्षांनी काँग्रेसच्या तिकिटावर लालकृष्ण अडवाणी यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली होती; परंतु, त्यांना यश आले नव्हते. केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील तिरुनेलईमध्ये 15 डिसेंबर 1932 रोजी त्यांचा जन्म झाला होता. अमेरिकेतल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून त्यांनी सार्वजनिक प्रशासना(Public Administration)ची पदवी मिळवली होती. टी. एन. शेषन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी निवडणूक सुधारणांसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे भारतीय लोकशाही बळकट झाली. ते उत्कृष्ट अधिकारी होते. त्यांनी मेहनतीने आणि सचोटी देशसेवा केली, असे त्यांनी टि्वटवर म्हटले आहे.  तामिळनाडूत जन्मलेल्या या अधिका-याने भारतातील निवडणुकीच्या प्रक्रियेत अनेक सुधारणा केल्या. अर्थात शेषन यांना ते करताना प्रचंड विरोधही झाला. सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या निवडणुकीतील आमूलाग्र बदलांना विरोध केला, पण या गृहस्थाने कुठल्याही दबावाला बळी न पडता निवडणुकीत सुधारणा घडवून दाखवल्या, त्यामुळे आज ज्या काही निकोप निवडणुका होत आहेत, त्याचे श्रेय फक्त आणि फक्त टी. एन. शेषन यांच्याकडे जाते. निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी त्यांच्या कार्यकाळापासून सुरू झाली. कधीही, कुठेही, कसाही प्रचार करणे, ध्वनिक्षेपणाचा अमर्यादित वापर अशांमुळे होणारा त्रास, याचा कुठेही विचार केला जात नव्हता, त्यालासुद्धा टी. एन. शेषन यांनीच चाप बसविला. रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत प्रचार करण्यास प्रतिबंध, सार्वजनिक ठिकाणी होणा-या जाहीर सभा, त्यामुळे वाहतुकीस होणारी अडचण, नागरिकांचा खोळंबा यावर कडक बंदी आणली गेली. रस्त्यावर कुठेही सभा न घेता सभांसाठी निवडणूक आयोग ठरवेल त्याच जागी सभा घेणे. प्रचारासाठी धार्मिक स्थळांचा होणारा गैरवापर पूर्णत: बंद करणे. धर्माच्या नावावर, देवांच्या नावावर, राष्ट्रीय पुरुषांच्या नावावर मते मागण्यास बंदी त्यांनीच आणली. ध्वनिक्षेपक वापर रात्री 10नंतर बंद म्हणजे बंद! मग तो कुणीही असो. परवानगी नाही, असे अनेक बदल टी. एन. शेषन यांनी केले.

>देशाच्या निवडणूक यंत्रणेत सुधारणा आणि तिचे बळकटीकरण करण्याचे मोठे काम टी.एन. शेषन यांनी केले. लोकशाहीची ओळख करून देणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख कायम राहील. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री.>मी यासाठी मनापासून शोक व्यक्त करतो की, निवडणूक सुधारणांमध्ये टी.एन. शेषन यांनी दिलेले योगदान आमच्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे.- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री.