शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमूल डेअरीमध्ये घोटाळा, गुजरातचे माजी गृहमंत्री विपुल चौधरी अटकेत

By बाळकृष्ण परब | Updated: December 14, 2020 13:31 IST

Amul Dairy scam : गुजरातमधील अमूल घोटाळा सध्या चर्चेत आहे. कोट्यवधीच्या या घोटाळ्याप्रकरणी काल दूधसागर डेअरीचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे माजी गृहमंत्री विपूल चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देविपूल चौधरी यांच्यावर आर्थिक अफरातफर आणि पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप विपुल चौधरी यांनी २०१३ मध्ये महाराष्ट्रामध्ये सुमारे २२ कोटी रुपयांचा पोषण आहार पाठवला होतादुष्काळादरम्यान महाराष्ट्रात पोषण आहार पाठवणे हा काही भ्रष्टाचार नाही, विपुल चौधरींचा दावा

अहमदाबाद - गुजरातमधील अमूल घोटाळा सध्या चर्चेत आहे. कोट्यवधीच्या या घोटाळ्याप्रकरणी काल दूधसागर डेअरीचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे माजी गृहमंत्री विपूल चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी तक्रारदार भगवानभाई चौधरी यांनी विपूल चौधरी यांच्यावर आर्थिक अफरातफर आणि पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करत मेहसाणा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.गांधीनगर सीआयडी क्राइम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार दूधसागर डेअरीचे माजी अध्यक्ष विपुल चौधरी, विद्यमान अध्यक्षा आशा ठाकोर, उपाध्यक्ष मेघजी ठाकोर, व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह ३० अधिकाऱ्यांनी मिळून डेअरीच्या १९३२ कर्मचाऱ्यांना अतिरिक्त बोनसच्या रूपात सुमारे १५ कोटी रुपये देऊन अर्ध्याहून अधिक रक्कम विपुल चौधरी यांच्या खात्यात जमा केली.मेहसाणा सहकारी दुग्ध उत्पादन संघाचे चेअरमन असताना विपुल चौधरी यांनी २०१३ मध्ये महाराष्ट्रामध्ये सुमारे २२ कोटी रुपयांचा पोषण आहार पाठवला होता. २०१४ मध्ये सहकारी रजिस्ट्रार यांच्या येथे तक्रार करण्यात आली तेव्हा रजिस्ट्रार यांनी विपुल चौधरी यांनी जानेवारी २०१५ मध्ये एक नोटिस जारी केली होती. त्यावर जुलै २०१८ मध्ये सहकारी ट्र्रिब्युनला स्थगिती देऊन चौधरी यांना ऑक्टोबर २०१८ पर्यंत नऊ कोटी १० लाख रुपये जमा करण्याचा आदेश दिला होता.या प्रकरणी विपुल चौधरी यांनी सांगितले की, दुष्काळादरम्यान महाराष्ट्रात पोषण आहार पाठवणे हा काही भ्रष्टाचार नाही आहे. चौधरींनी केलेल्या दाव्यानुसार सुमारे सव्वा अकरा कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यासाठी त्यांनी आपली जमीनसुद्धा गहाण ठेवली होती.दरम्यान, दूधसागर डेअरीची निवडणूक पाच जानेवारी रोजी होणार आहे. विपुल चौधरी पुन्हा एकदा डेअरीचे चेअरमन बनण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र त्यापूर्वीच डेअरीमधील अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :GujaratगुजरातCorruptionभ्रष्टाचार