शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

माजी नगरसेवकाच्या ट्रॅक्टरने चार जणांना उडविले

By admin | Updated: January 27, 2016 23:16 IST

जळगाव- जुने जळगावातील आंबेडकरनगरात अंत्ययात्रेसाठी आलेल्या दोन महिलांसह चौघांना ट्रॅक्टरने उडविले. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमींची प्रकृती बरी असून, त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जळगाव- जुने जळगावातील आंबेडकरनगरात अंत्ययात्रेसाठी आलेल्या दोन महिलांसह चौघांना ट्रॅक्टरने उडविले. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमींची प्रकृती बरी असून, त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
धडक देणारे ट्रॅक्टर हे माजी नगरसेवक आबा बाविस्कर यांच्या मालकीचे असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. तर ट्रॅक्टर युवक गणेश दंगल सोनवणे (वय १९) रा.वाल्मीकनगर हा चालवित होता. त्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.

अंत्ययात्रा गेल्यावर ट्रॅक्टर धडकले
आंबेडकरनगरात माजी नगरसेवक शालीक अप्पा सोनवणे यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी त्यांचे ठिकठिकाणचे नातेवाईक, आप्त आले होते. अंत्ययात्रा आंबेडकरनगरातून गेल्यानंतर महिला, काही पुरुष, युवक रस्त्याच्या कडेला उभे होते. यातच समोरून एक ट्रॅक्टर आले. त्याचा वेग कमी होता. पण ते महिलांच्या अंगावर आले. ते इतरांच्या दिशेने जाईल तोपर्यंत जगन्नाथ साळवे व शशिकांत अडकमोल यांनी ब्रेक दाबून ते थांबविले. ट्रॅक्टर थांबल्याने पुढील अनर्थ टळला.

महिलेच्या पायावरून गेले चाक
धु्रपदाबाई कौतिक अडकमोल रा.पंचशीलनगर भुसावळ यांच्या पायांवरून चाक फिरले. त्यात त्यांच्या तळपायांना गंभीर इजा झाली आहे. तर उषाबाई जगन्नाथ साळवे रा.रामानंदनगर यांच्या डोक्याला मार लागला. तसेच शशिकांत अडकमोल (वय ४०) व आशीष विनोद अडकमोल (वय १५ वर्षे) दोघे रा.पंचशीलनगर, भुसावळ हेदेखील जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्यावर लागलीच उपचार सुरू झाले. घटनेत कुणीही गंभीर जखमी झालेले नसून, सर्व जखमींची प्रकृती बरी असल्याचे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. शहर पोलिसांमधील कर्मचार्‍यांनी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची माहिती घेतली.