शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

"मृत्यू डोळ्यासमोर होता, २०-२५ मिनिटेच शिल्लक होती..."; शेख हसीना यांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:37 IST

कोटालीपारा इथं शेख हसीना यांना मारण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला ज्याचा उल्लेख त्यांनी ऑडिओ संदेशमध्ये केला.

नवी दिल्ली - बांगलादेश ५ ऑगस्टचा तो दिवस सहजपणे विसरू शकत नाही. त्याचदिवशी शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत भारताकडे आश्रय घेतला. बांगलादेशातील बिकट परिस्थितीमुळे हसीना यांना देश सोडून पळून जावं लागले. त्यानंतर बांगलादेशात हिंदूंची घरे, मंदिरे यांना टार्गेट करण्यात आले. आता या संपूर्ण घडामोडीवर शेख हसीना यांनी गंभीर आरोप लावला आहे. सत्तेतून बाहेर पडताच मी आणि माझी बहीण शेख रेहाना यांच्या हत्येचं षडयंत्र रचण्यात आलं होते असा खुलासा त्यांनी केला.

शेख हसीना यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या बांगलादेश आवामी लीगच्या फेसबुकवर ऑडिओ संदेश पोस्ट केला आहे. त्यात त्या म्हणाल्या की, रेहाना आणि मी थोडक्यात वाचलो, मृत्यू आमच्या डोळ्यासमोर होता आणि आमच्याकडे फक्त २०-२४ मिनिटे बाकी शिल्लक होती. आमच्या हत्येचं षडयंत्र अनेकदा रचण्यात आले होते. २१ ऑगस्टला झालेल्या घटनेत वाचणे, कोटालीपारा इथं बॉम्ब स्फोटातून बचावणे आणि ५ ऑगस्टला जिवंत राहणे ही अल्लाहची इच्छा होती. जर अल्लाहची इच्छा नसती तर आतापर्यंत मी जिवंत राहिली नसती असं त्यांनी सांगितले.

तसेच मला कशाप्रकारे मारण्याचा डाव रचला होता ते सगळ्यांनी पाहिले. अल्लाहच्या कृपेने मी वाचले. मी पीडित असून माझ्या देशाविना, घराविना राहत आहे. सर्व काही जाळून टाकले असंही भावूक होत शेख हसीना यांनी म्हटलं. शेख हसीना यांची सुरक्षा व्यवस्था चोख असतानाही अनेकदा त्या हत्येच्या प्रयत्नातून वाचल्या. २००४ मध्ये ढाका ग्रेनेड हल्ला २१ ऑगस्ट  २००४ रोजी पक्षाच्या दहशतवाद विरोधी रॅलीत झाला होता. त्यावेळी २४ लोक मारले गेले आणि ५०० हून अधिक जखमी होते. हा हल्ला संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी झाला तेव्हा विपक्ष नेत्या शेख हसीना या २० हजारांच्या सभेला संबोधित करत होत्या. या हल्ल्यात हसीना या किरकोळ जखमी झाल्या. 

कोटालीपारा इथं शेख हसीना यांना मारण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला ज्याचा उल्लेख त्यांनी ऑडिओ संदेशमध्ये केला. २१ जुलै २००० रोजी ७६ किलो आरडीएक्स बॉम्ब जप्त करण्यात आले होते आणि २ दिवसांनी कोटालीपूराच्या शेख लुत्फोर रहमान आयडिएल कॉलेजमधून ४० किलो आरएडीएक्स जप्त केले होते. ज्याठिकाणी आवामी लीगच्या अध्यक्षा आणि तत्कालीन विरोधी पक्षनेत्या शेख हसीना या २२ जुलैला रॅली करणार होत्या. 

काय आहे प्रकरण?

मागील वर्षी बांगलादेशात आरक्षण प्रणाली रद्द करण्याच्या मागणीवरून आंदोलन उभं राहिले होते. बांगलादेशात १९७१ साली मिळालेल्या स्वातंत्र्यसंग्रमातील कुटुंबाला ३० टक्के सरकारी नोकरीत आरक्षण द्यावं याविरोधात हा मोर्चा होता. या आरक्षणविरोधी मोर्चाने देशात हिंसक रुप प्राप्त केले. त्यानंतर देशातील अवस्था इतकी बिकट झाली ज्यामुळे शेख हसीना यांना देशातून पळून भारतात आश्रय घ्यावा लागला. या हिंसक आंदोलनात ६०० हून अधिक लोक मारले गेले.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश