शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवली, आयबीच्या अलर्टनंतर गृहमंत्रालयाकडून झेड सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 18:32 IST

झेड कॅटगरीमध्ये ४ ते ६ एनसीजी कमांडो, सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या रिपोर्टनुसार एस जयशंकर यांची सुरक्षा वाय वरून झेड कॅटगरीची करण्यात आली आहे. याचबरोबर, अमित जोगी यांची सुरक्षा मंत्रालयाने झेड कॅटगरीत वाढवली आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, आयबीने जारी केलेल्या धमकीच्या रिपोर्टनंतर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाय वरून झेड करण्यात आली आहे. आयबीच्या रिपोर्टनंतर गृह मंत्रालयाने हे मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता एस जयशंकर यांच्या सुरक्षेसाठी पूर्वीपेक्षा जास्त जवान तैनात केले जाणार आहेत. एस जयशंकर यांच्या सुरक्षेसाठी आता ३६ सीआरपीएफ कमांडो तैनात करण्यात येणार आहेत.

झेड कॅटगरीची सुरक्षा म्हणजे काय?केंद्र सरकारने सुरक्षेसाठी एकूण ५ कॅटगरी तयार केल्या आहेत. यामध्ये एक्स, वाय, वाय प्लस, झेड आणि झेड प्लस कॅटगरी आहेत. व्यक्तीचे महत्त्व आणि धोका लक्षात घेऊन ही सुरक्षा दिली जाते. याशिवाय, पंतप्रधानांसाठी एसपीजी सुरक्षेचीही तरतूद आहे. झेड कॅटगरीमध्ये ४ ते ६ एनसीजी कमांडो, सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिसांचा समावेश आहे.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकर