शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सुषमा स्वराज यांचं विमान 14 मिनिटांसाठी बेपत्ता, मॉरिशस हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 18:01 IST

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या मेघदूत या विमानाने दिल्लीहून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर शनिवारी रवाना झाल्या.

नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या मेघदूत या विमानाने दिल्लीहून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर शनिवारी रवाना झाल्या. त्याच वेळी त्रिवेंद्रम ते मॉरिशस या प्रवासादरम्यान स्वराज यांच्या विमानाचा मॉरिशसच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी सुमारे 12 ते 14 मिनिटे संपर्क तुटला होता. पण तो पुन्हा प्रस्थापित झाल्याने सा-यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.मेघदूत विमानाने मॉरिशसच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर ही घटना घडल्याने काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात एअरपोर्ट्स आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एएआय) वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, एखादे विमान ज्या हवाई हद्दीत प्रवेश करते तेथील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क अर्धा तास झाल्यानंतरही पुन्हा प्रस्थापित होऊ शकला नाही तर ते विमान बेपत्ता झाल्याचे जाहीर करावे, असा जागतिक संकेत आहे. सुषमा स्वराज यांच्या विमानाशी असलेला संपर्क तुटल्याने बाराव्या मिनिटाला मॉरिशस हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने हे विमान शेवटचे चेन्नई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या संपर्कात होते, तिथे संपर्क साधला व या घटनेची माहिती दिली.समुद्रावरून जाताना संपर्कात येतात अडचणीसुषमा स्वराज यांचे विमान शनिवारी संध्याकाळी चार वाजता त्रिवेंद्रमहून रवाना झाले होते. चेन्नई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षानेही पुन्हा त्यांच्या विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश येत नव्हते. एखादे विमान जेव्हा समुद्रावरून चाललेले असते त्यावेळी त्याच्याशी संपर्क राखण्यात काही वेळेस अडचणी निर्माण होतात. कारण तिथे रडार कव्हरेज नसते. कधी कधी विमान चालक मॉरिशसच्या हवाई हद्दीत शिरल्यानंतर तेथील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यास विसरतात, असेही एएआयच्या सूत्रांनी सांगितले. ब्रिक्स देशांच्या होणा-या बैठकीसाठी तसेच भारत, ब्राझिल व दक्षिण आफ्रिका या देशांच्या मंत्र्यांमध्ये होणा-या चर्चेसाठी सुषमा स्वराज दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर आहेत. त्यासाठी शनिवारी केलेल्या प्रवासात इंधन भरण्यासाठी तसेच तांत्रिक गोष्टींसाठी त्यांचे विमान तीन ठिकाणी थांबले. त्यातील मॉरिशस येथे हे विमान तीन तास थांबले होते. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज