शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
3
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
4
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
5
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
6
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
7
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
8
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
9
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
10
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
11
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
12
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
13
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
14
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
15
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
16
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
17
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
19
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
20
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

तिसऱ्या दिवशीही सापडली १५६ पिशव्या भरून रोख रक्कम; दिवसभरात २० कोटींची मोजणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 08:41 IST

पिशव्यांमधून आतापर्यंत २० कोटी रुपयांची मोजणी झाली आहे. आतापर्यंत वसूल केलेली एकूण रक्कम २२० कोटी रुपये झाली आहे.

भुवनेश्वर : आयकर विभागाने शुक्रवारी करचुकवेगिरीच्या आरोपाखाली ओडिशा-आधारित मद्य उत्पादन कंपनी समूहाशी संबंधित ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी झडती घेतली असता १५६ पिशव्या भरून रोख सापडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पिशव्यांमधून आतापर्यंत २० कोटी रुपयांची मोजणी झाली आहे. आतापर्यंत वसूल केलेली एकूण रक्कम २२० कोटी रुपये झाली आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी बोलंगीर जिल्ह्यातील सुदापाडा येथे छापा टाकून रोख रक्कम असलेल्या तब्बल १५६ पिशव्या जप्त केल्या. त्यापैकी फक्त ६ ते ७ पिशव्यांतील रोख मोजली गेली, ती २० कोटींची भरली. याशिवाय संबलपूर, बोलंगीर, तितलागढ, बौध, सुंदरगड, राउरकेला आणि भुवनेश्वर येथे छापे टाकण्यात आले. विशेष म्हणजे या छाप्यांबाबत कंपनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कंपन्यांवर छापे 

पश्चिम ओडिशातील सर्वांत मोठ्या देशी-दारू उत्पादक आणि विक्री कंपन्यांपैकी एक असलेल्या बलदेव साहू अँड ग्रुप ऑफ कंपनीजच्या बोलंगीर कार्यालयावर गुरुवारी छापे टाकून सुमारे २०० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. बुधवारी सुंदरगढ शहरातील सरगीपाली येथील काही घरे, कार्यालये आणि मद्य उत्पादन कंपन्यांवर छापे टाकण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी भाजपने काँग्रेसला घेरले असून, प्रमुख नेत्यांवर टीका करण्यात येत आहे.

ओडिशातील सर्वांत मोठी रोकड जप्तीआयकर पथकाने भुवनेश्वरमधील पलासापल्ली येथील बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडचे कॉर्पोरेट कार्यालय, कंपनीच्या काही अधिकाऱ्यांची घरे, बौध येथील कंपनीचा कारखाना आणि कार्यालय आणि राणी सती राइस मिलची झडती घेतली. माजी आयकर आयुक्त सरत चंद्र दास यांनी सांगितले की, ओडिशातील आयकर विभागाने आतापर्यंत केलेली ही सर्वांत मोठी रोख जप्ती असू शकते.

लुटलेला पैसा जनतेला परत करावा लागेल, ही ‘मोदींची गॅरंटी’ : पंतप्रधानपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर विरोधकांवर टीकास्त्र सोडले. जनतेकडून लुटलेला पैसा तिला परत करावा लागेल, ही ‘मोदींची गॅरंटी’ आहे, असे एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. मोदींनी झारखंडमधील काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांच्याशी कथित संबंध असलेल्या एका व्यावसायिक समूहाच्या विविध ठिकाणांहून आयकर विभागाने २०० कोटी रुपये रोख वसूल केल्याच्या बातम्यांना टॅग केले.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स