ट्रकच्या धडकेत तरुण ठार
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
ट्रकच्या धडकेत तरुण ठार
ट्रकच्या धडकेत तरुण ठार
ट्रकच्या धडकेत तरुण ठारमोरफाटानजीक अपघात : ट्रकचालकास अटकदेवलापार : भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात नागपूर- जबलपूर मार्गावर मोरफाट्यानजीकच्या भुरालटोक येथे मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास झाला. सय्यद फहीम अजिज अहमद (२७, रा. नारी रोड, कपिलनगर, नागपूर) असे मृताचे नाव आहे. तो एमएच-३१/केआर-५६९३ क्रमांकाच्या मोटरसायकलने नागपूरकडून शिवनीकडे जात होता. दरम्यान मोरफाटा शिवारात भुरालटोकनजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या आरजे-१४/जीसी-३२०३ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात सय्यदचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच देवलापार पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महेंद्र खरतडे, जमादार नरेश वरकडे व शिपाई राहुल रंगारी, सचिन टेकाडे हे घटनास्थळी पोहचले. याप्रकरणी ट्रकचालक सोनूसिंग राजपूत (३२, रा. मुरेना, राजस्थान) याला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास ठाणेदार विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनात देवलापार पोलीस करीत आहे. (प्रतिनिधी)