श्रीनगर - नववर्षापूर्वी भारतात घुसून दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. रविवारी नौगाम विभारातील नियंत्रण रेषेवर लष्कराने पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (BAT) च्या कारवायांना सुरुंग लावताना दोन घुसखोरांना ठार मारले. तसेच मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी BAT ची पथके मोठ्या प्रमाणात दारुगोळा घेऊन नियंत्रण रेषेजवळील जंगलात येत आहेत. तसेच त्यांना कव्हर करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात येत आहे.
LOC वर पाकिस्तानचा हल्ला लष्कराने पाडला हाणून, BAT च्या दोन कमांडोंना कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 09:30 IST
नववर्षापूर्वी भारतात घुसून दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे.
LOC वर पाकिस्तानचा हल्ला लष्कराने पाडला हाणून, BAT च्या दोन कमांडोंना कंठस्नान
ठळक मुद्देनववर्षापूर्वी भारतात घुसून दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला नौगाम विभारातील नियंत्रण रेषेवर लष्कराने पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (BAT) च्या कारवायांना सुरुंग लावताना दोन घुसखोरांना ठार मारलेमोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त