शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

चारा घोटाळा- लालू प्रसाद यादव यांना साडे तीन वर्षांचा कारावास व पाच लाख रूपये दंड, रांचीच्या सीबीआय कोर्टाने सुनावली शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 16:48 IST

रांची- राजदचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणी रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच पाच लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे.  रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावली गेली. 23 डिसेंबरला झालेल्या सुनावणीत त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं होते. ...

रांची- राजदचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळाप्रकरणी रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसंच पाच लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे.  रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावली गेली. 23 डिसेंबरला झालेल्या सुनावणीत त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवलं होते. तब्बल २१ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. लालूंच्या शिक्षेची सुनावणी तीनवेळा टळली होती. त्यानंतर अखेर आज लालूप्रसाद यादव यांना शिक्षा सुनावण्यात आली. चारा घोटाळ्याप्रकरणी साडेतीन वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपये दंड अशी शिक्षा त्यांना सुनावण्यात आली.  लालू प्रसाद यादव यांना रांची कोर्टाकडून जामीन मिळणार नाही त्यासाठी त्यांना हायकोर्टात जावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

या प्रकरणातील इतर दोषी फूलचंद, महेश प्रसाद, बेक जूलियस, सुनील कुमार, सुशील कुमार, सुधीर कुमार आणि राजाराम यांनाही साडेतीन वर्षांचा कारावास आणि ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात लालूप्रसाद यादव यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते अशी शक्यता कायदेतज्ज्ञ व्यक्त करत होते. मात्र आपल्या तब्येतीचे कारण देत लालूप्रसाद यादव यांनी शिक्षा कमी करण्याची विनंती कोर्टाला केली होती.

 

लालूंसह १६ आरोपींना दोषी ठरविणारा निकाल विशेष न्या. शिवपाल सिंग यांनी जाहीर केला. यानंतर, सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली. सन १९९० नंतर लालू प्रसाद यांनी संपादित केलेल्या सर्व मालमत्ता जप्त करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. आणखी एक माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह सहा आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले गेले.तिजोरीतून, सन १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले बनवून फसवणुकीने ८९.२७ लाख रुपये काढून अपहार केल्याच्या खटला होता. चाऱ्याचा पुरवठा न करताच, कंत्राटदारांच्या नावे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही, मुख्यमंत्री या नात्याने लालूंनी त्याकडे कानाडोळा केला, असा त्यांच्यावर आरोप होता.

या घोटाळ्याच्या ३३ पैकी ६ खटल्यांमध्ये लालू आरोपी होते. त्यापैकी दोन खटल्यांमध्ये ते दोषी ठरले आहेत. अन्य चार खटल्यांचे कामकाज सुरू आहे. चैबासा तिजोरीतून झालेल्या ३७.५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी लालूंना ५ वर्षांची कैद व २५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली होती. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला, पण शिक्षेला स्थगिती न दिल्याने त्यांना ११ वर्षे निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली. 

चारा घोटाळा प्रकरण नेमकं काय ?चारा घोटाळा पहिल्यांदा 1996 साली समोर आला. यामध्ये बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळ्याचा खुलासा झाला. 1990 ते 1997 दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याच आरोप आहे. चारा घोटाळ्यात 3 वेगवेगळी प्रकरण असून तिन्हीही प्रकरणात लालू प्रसाद यादव आरोपी आहेत.  

लालू प्रसाद यादव पहिल्यांदा चारा घोटाळ्यामुळे तुरूंगात गेले होते. त्यावेळी लालू प्रसाद यादव पत्नीला बिहारचं मुख्यमंत्री पद देऊन तुरूंगात गेले. त्यावेळी याचा कुठलाही परिणाम लालू प्रसाद यादव यांच्या पक्षावर झाला नाही. पण आता परिस्थिती वेगळी आहे. कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर 2013मध्ये लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. लालू प्रसाद यादव यांचं लोकसभेचं सदस्यत्व काढून घेतलंहोतं. तसंच त्यांना 11 वर्ष कुठलिही निवडणूक लढविण्यावर बंद घातली होती. 

चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय आरोपींमध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह विद्यासागर निषाद, आर के राणा, घ्रुल भगत, आयएए अफसर महेश प्रसाद यांसारख्या नेत्यांचाही सहभाग आहे. या प्रकरणातील सात आरोपींचा मृत्यू झाला तर दोन आरोपी सरकारी साक्षीदार बनले आहेत.               

 

टॅग्स :Fodder scamचारा घोटाळाLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवCourtन्यायालय