शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधील  पूरस्थिती बिकट, मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 22:23 IST

नेपाळमधील मैदानी भाग आणि सीमांचलमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे  बिहारमधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे पूर्णिया किशनगंज, कटिहार, अररिया, दरभंगासह एकूण १८ जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे.

पाटणा, दि. १४ - नेपाळमधील मैदानी भाग आणि सीमांचलमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे  बिहारमधील पूरस्थिती गंभीर झाली आहे. मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे पूर्णिया किशनगंज, कटिहार, अररिया, दरभंगासह एकूण १८ जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. या जिल्ह्यांमधील दूर्गम भागात वसलेल्या गावांमध्ये परिस्थिती अधिकच खराब झाली आहे. तसेच परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. या पुरस्थितीमुळे सुमारे एक कोटी नागरिकांना फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिहार आणि नेपाळच्या सीमेलगतच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच नेपाळकडून धरणांमधील पाणी सोडण्यात येत असल्याने परिस्थिती अधिकच बिघडली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारकडून लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली आहे. तसेच हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्तांसाठी खाद्यान्नाची पॅकेट टाकण्यात येत आहेत.  या पूरस्थितीबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, "पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू  आहे. आम्ही उद्या आपातकालीन विभाग, रस्तेबांधणी विभाग आणि ग्रामीण कार्य विभागाचे मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठवणार आहोत." तसेच पुराचा फटका बसलेल्यांसाठी मदत आणि भोजन केंद्रेही सुरू केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील रणनीती ठरवण्यासाठी आम्ही एक बैठक बोलावली आहे. तसेच एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके सीतामढी, मधुबनी आणि चंपारण्य जिल्ह्यात पाठवण्यात आली आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन राज्य सरकारला दिले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांच्याशी राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा केली आहे.