कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची सीबीआय न्यायालयाकडून खाण घोटाळ्याप्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली
टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरुन सायरस मिस्त्री यांची गच्छंती
23 ऑक्टोबर : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यानात कोरियातून आणणलेल्या आठ पेंग्विनपैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला
मनसेच्या अटी मान्य केल्यानंतर करण जोहरचा "ए दिल है मुश्किल" सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट मोकळी झाली होती. उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकार असलेल्या सिनेमांना मनसे तीव्र विरोध दर्शवला होता
22 ऑक्टोबर : कबड्डी विश्वचषकात भारताने इराणचा 38-29 असा पराभव करत जगज्जेतेपदाला गवसणी घातली
स्टेट बँकेच्या खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढून घेण्याचा प्रकार समोर आल्याने स्टेट बँकेचे 6 लाखांहून अधिक कार्ड ब्लॉक करण्यात आले होते
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संशोधक नयन खानोलकर यांना लंडन येथील नॅशन हिस्ट्री म्युझियमतर्फे 2016चा सर्वोत्कृष्ट छायाचित्राचा पुरस्कार जाहीर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 90 वर्षांच्या इतिहासात प्रथमच खाकी हाफ पेंटऐवजी चॉकलेटी रंगांची पूर्ण विजार पोशाख विजयादशमीच्या मुहूर्तावर वापरात आली
इस्त्रोच्या जीसॅट- 18 उपग्रहाचे यशस्वी उड्डाण
ब्रिटिश अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ ऑलिव्हर हार्ट व फिनलंडचे बेंट होल्मस्ट्रॉम यांना "कंत्राट सिद्धांता"साठी नोबेल पुरस्कार
जपानचे योशिनोरी ओसुमी यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले होते