शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

फ्लॅशबॅक 2016 : जुलै

By admin | Updated: December 24, 2016 00:00 IST

संपूर्ण आयुष्य देशभरातील आदिवासींच्या हक्कांसाठी लढणा-या आणि त्यांच्या जगण्याला लेखनातून आवाज निर्माण करून देणा-या सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ बंगाली लेखिका महाश्वेता देवी २८ जुलै रोजी निधन झालेचेन्नई येथून पोर्ट ब्लेअरकडे जाण्यासाठी आकाशात झेपावलेले हवाई दलाचे एएन-३२ हे मालवाहू विमान बेपत्ता झाले विमानात काही अधिका-यांसह २९ जणांचा समावेश होता.फ्रान्समधील ट्रकहल्ल्याची ...

संपूर्ण आयुष्य देशभरातील आदिवासींच्या हक्कांसाठी लढणा-या आणि त्यांच्या जगण्याला लेखनातून आवाज निर्माण करून देणा-या सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ बंगाली लेखिका महाश्वेता देवी २८ जुलै रोजी निधन झाले

चेन्नई येथून पोर्ट ब्लेअरकडे जाण्यासाठी आकाशात झेपावलेले हवाई दलाचे एएन-३२ हे मालवाहू विमान बेपत्ता झाले विमानात काही अधिका-यांसह २९ जणांचा समावेश होता.

फ्रान्समधील ट्रकहल्ल्याची घटना ताजी असतानाचा २२ जुलै रोजी जर्मनीतील म्युनिक शहरात तीन हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात अनेक जण ठार झाले.

पंधरा वर्षांच्या अलपवयीन मुलीवर अनन्वित अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची नृशंस घटना अहमदनगरमधील कोपर्डी येथे घडली. या घटनेमुळे राज्यात संतापाचे वातावरण असून ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला तसेच विधीमंडल अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले.

लोकनियुक्त सरकार उलथवून सत्ता काबीज करण्याचा लष्कराचा प्रयत्न तुर्कस्तान सरकारने हाणून पाडला. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत २६५ जण ठार झाले तर हजाराहून अधिक नागरिक जखमी झाले.

फ्रान्समधील नाइस शहरात एका माथेफिरू ट्रकचालकाने थेट गर्दीत ट्रक घुसवून अनेकांना चिरडले. या घटनेत ८४ जण ठार झाले तर शेकडो नागरिक जखमी झाले.

ब्रिटनच्या अँडी मरेने कॅनडाच्या मिलोस राओनिकचा पराभव करत विम्बल्डन ग्रँड स्लॅम अजिंक्यपदाला गवसणी घातली.

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात लष्कराच्या जवानांनी हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बु-हान वनीसह तीन अतिरेक्यांना कंठस्नान घातले.

करचुकवेगिरी प्रकरणी स्पेनच्या न्यायालयाने बार्सिलोनाचा अव्वल फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी व त्याच्या वडिलांना २१ महिन्यांचा तुरुंगवास आणि ४१ लाख डॉलरचा दंड ठोठावला.

रोहित वेमुला प्रकरण तसेच शिक्षणाच्या मुद्यावरून वादग्रस्त ठरलेल्या स्मृती इराणी यांच्याकडील मनुष्यबळ विकास मंत्रीपद काढून त्यांच्याजागी कॅबिनेटपदी बढती दिलेल्या प्रकाश जावडेकरांची नियुक्ती करण्यात आली. तर इराणींकडे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रलयाचा कारभार सोपवण्यात आला.

- जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशची राजधानी ढाका येथील परदेशी दूतावास वकिलांतीची कार्यालये असलेला सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या डिप्लोमॅटिक क्वार्टरच्या उपहारगृहातील दहशतवाद्यांनी ५ ते ९ दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात २० नागरिक ठार झाले. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाने (इसिस) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.