शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुदतवाढ मिळालेल्या कर्मचाऱ्यांना निश्चित वेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 02:58 IST

वित्त मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या व्यय विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन हे त्याने उचलेला  शेवटचा पगार आणि त्याचे निवृत्ती वेतन यातील फरकावर आधारित असेल.

नवी दिल्ली : निवृत्तीनंतर कामावर घेण्यात आलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना निश्चित (फिक्सड्) वेतन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढ मिळणार नाही.वित्त मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या व्यय विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन हे त्याने उचलेला शेवटचा पगार आणि त्याचे निवृत्ती वेतन यातील फरकावर आधारित असेल. त्यांच्या वेतनात कंत्राट काळात कोणताही बदल होणार नाही. त्यांना प्रवास भत्ता मिळेल तसेच काम केलेल्या प्रत्येक महिन्यासाठी १.५ दिवस पगारी अनुपस्थितीचा लाभ मिळेल.व्यय विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना कंत्राटी नियुक्त्या देण्याचा प्रघात ठरू नये. सार्वजनिक हितासाठी गरज असेल तेव्हाच अशा नियुक्त्या देण्यात याव्यात. त्या कमीत कमी प्रमाणात राहतील, हे पाहायला हवे. अशा कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणे कसे गरजेचे आहे, याचा योग्य तपशील नियुक्ती देणाऱ्या प्राधिकरणासमोर ठेवल्यानंतरच नियुक्त्या देण्यात याव्यात.