शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या बेशिस्त प्रवाशावर पाच वर्षे विमान प्रवासबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:44 IST

जेट एअरवेजने व्यवसायाने ज्वेलर असलेल्या बिरजू प्रसाद सल्ला या मुंबईच्या प्रवाशावर पाच वर्षांसाठी हवाई प्रवासबंदी लागू केली आहे.

नवी दिल्ली : विमानाचे अपहरण करण्यात आल्याची आवई उठवून विमान आणि प्रवाशांच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केल्याबद्दल जेट एअरवेजने व्यवसायाने ज्वेलर असलेल्या बिरजू प्रसाद सल्ला या मुंबईच्या प्रवाशावर पाच वर्षांसाठी हवाई प्रवासबंदी लागू केली आहे.बेशिस्त प्रवाशांवर अशा प्रकारची कारवाई करण्याची आणि त्यांना ‘नो प्लार्इंग लिस्ट’वर टाकण्याची नियमावली नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लागू केल्यानंतर प्रवाशावर अशा प्रकारची कारवाई केली जाण्याची ही पहिली वेळ आहे.सल्ला यांचे नाव जेट एअरवेजने ‘नो फ्लाइंग लिस्ट’ मध्ये टाकले असले तरी ही बंदी फक्त त्याच कंपनीच्या विमानांच्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांना लागू होईल. बंदी घातलेल्या प्रवाशास विमानाने प्रवास करू द्यायचा की नाही याचा निर्णय इतर कंपन्या घेऊ शकतील.गेल्या वर्षी ३० आॅक्टोबर रोजी जेटच्या मुंबई-दिल्ली विमानाने प्रवास करत असताना सल्ला यांनी बिझनेस क्लासच्या स्वच्छतागृहात विमान अपहरणाची घबराट निर्माण करणारी एक चिठ्ठी ठेवली होती. त्यात ‘१२ अपहरणकर्त्यांनी विमान ताब्यात घेतले आहे व सामान ठेवायच्या जागेत स्फोटकेही आहेत. विमान दिल्लीला न उतरविता थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेऊन जावे. तसे न केल्यास अनेक प्रवाशांना हकनाक प्राणास मुकावे लागेल’, असे लिहिले होते.यानंतर विमान अहमदाबादला उतरवून तपासणी केली असता सल्ला यांनी चिठ्ठीत लिहिलेली धमकीवजा माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे निष्पन्न झाले होते.समितीने केली चौकशी‘नो फ्लाइंग लिस्ट’साठी तयार करण्यात आलेल्या नियमानुसार जेट एअरवेजने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या घटनेची चौकशी केली व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन समितीच्या शिफारशीनुसार सल्ला यांच्यावर पाच वर्षांसाठी प्रवासबंदी लागू केली.

टॅग्स :Jet Airwaysजेट एअरवेज