शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील कारवाईत पाच दहशतवाद्यांना अटक, आयएसआय व खलिस्तानवाद्यांशी संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 07:12 IST

Terrorists News : : दिल्लीतील शकरपूर भागामध्ये सोमवारी पोलिसांनी पाच दहशतवाद्यांना अटक केली. त्यातील दोन जण पंजाबचे व तीन जण काश्मीरचे आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीतील शकरपूर भागामध्ये सोमवारी पोलिसांनी पाच दहशतवाद्यांना अटक केली. त्यातील दोन जण पंजाबचे व तीन जण काश्मीरचे आहेत. या दहशतवाद्यांचे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय व खलिस्तानवाद्यांशी संबंध असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. शौर्यचक्र पुरस्कार विजेते बलविंदरसिंग भिखीविंड यांच्या हत्येमागे हे दहशतवादी असल्याचा पोलिसांना संशय आहे.यासंदर्भात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी सांगितले की, अटक केलेल्या पाच दहशतवाद्यांपैकी दोघे जण पंजाबमधील असून गुरजीतसिंग भुरा, सुखदीप अशी त्यांची नावे आहेत. उर्वरित तीन काश्मिरी आयएसआयच्या संपर्कात असल्याचेही आढळून आले. खलिस्तानवाद्यांविरोधात जोरदार लढा देणारे बलविंदरसिंग भिखीविंड यांची १६ ऑक्टोबर रोजी पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यातील त्यांच्या गावी दोन जणांनी गोळी झाडून हत्या केली होती. खलिस्तानवाद्यांनीच हे कृत्य केले असावे असा पोलिसांचा कयास होता व त्यादृष्टीने तपास सुरू आहे. 

जातीय तणाव निर्माण करण्याचे कारस्थान  दिल्ली पोलिसांनी सांगितले की, बलविंदरसिंग भिखीविंड हत्या प्रकरणाचा पंजाब पोलीस तपास करत आहेत. भिखीविंड यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्रेही यांच्याकडून दिल्ली पोलिसांनी जप्त केली आहेत.  पंजाबमध्ये हे दहशतवादी काही लोकांची ठरवून हत्या करत असत. जातीय तणाव निर्माण करण्याचे कारस्थान त्यामागे होते.

टॅग्स :terroristदहशतवादीdelhiदिल्ली