उदयनगर चौकातील पाच दुकाने तोडली
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
उदयनगर चौकातील पाच दुकाने तोडली
उदयनगर चौकातील पाच दुकाने तोडली
उदयनगर चौकातील पाच दुकाने तोडली - नासुप्रने १० वर्षांपूर्वी दिली होती नोटीस नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुरुवारी मानेवाडा रिंग रोडवरील उदयनगर चौकातील पाच अनधिकृत दुकानांचे बांधकाम तोडले. मौजा चिखली खुर्द येथील खसरा क्रमांक ९/२ श्रीरामनगर गृह निर्माण सहकारी संस्थेच्या प्लॉट नंबर ६७/अ वर कांबळे यांचे घर आहे. काही वर्षांपूर्वी रिंग रोडचे काम सुरू असतांना त्यांच्या घराचा एक भाग रस्त्याच्या कामामध्ये येत होता. त्यामुळे नासुप्रने रस्त्याच्या कामासाठी घरातील त्या जागेचे अधिग्रहण केले होते. तसेच त्या भागावर कुठलेही बांधकाम न करण्याचे लिखित आश्वासनसुद्धा घेतले होते. यानंतरही घर मालकाने काही दिवसानंतर नियमांना धाब्यावर बसवून पाच दुकानांचे बांधकाम केले. ही दुकाने भाड्यावर दिली. येथे मिष्ठान भंडार, पान मंदिर, कोल्ड ड्रिंक्स, सोडा कॉर्नर आणि मोबाईल शॉपी आदी दुकाने सुरू करण्यात आली. यासंबंधात नासुप्रने १० वर्षांपूर्वी घरमालकाला संबंधित दुकानाचे बांधकाम हटविण्यासाठी नोटीस बजावली होती. परंतु प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने घरमालकाची याचिका रद्द केली. त्यानुसार नासुप्र अधिकाऱ्यांनी पोलीस दलासह गुरुवारी ही कारवाई केली.