टँकर व रिक्षाची धडक, पाच जण जखमी
By admin | Updated: April 25, 2016 00:27 IST
जळगाव : भरधाव वेगाने येणारा टँकर व रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री ममुराबादनजीक झाला.
टँकर व रिक्षाची धडक, पाच जण जखमी
जळगाव : भरधाव वेगाने येणारा टँकर व रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री ममुराबादनजीक झाला. रिक्षामधील सुरेखा मुकेश बोरसे (२३, रा. पिंप्राळा हुडको), सिंधूबाई दिलीप कोळी (५०, रा. इदगाव), देविदास भास्कर पाटील (५०, रा. असोदा), योगिता सुरेश कदम (२३, रा. पिंप्राळा हुडको) व समाधान रतन सोनवणे (२५, रा. इदगाव) या जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले.