शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सहा दिवसांत पाच हार्ट अटॅक, तरीही ८१ वर्षीय वृद्धा बचावली; हृदय केवळ २५ टक्के कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 09:21 IST

महिलेला हृदयविकाराचे झटके येऊनही त्यातून ती बचावणे ही आगळी घटना असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दिल्लीमध्ये ८१ वर्षे वयाच्या एका महिलेला सहा दिवसांत पाच हृदयविकाराचे झटके आले; पण सुदैवाने ती त्यातून बचावली आहे. या महिलेस श्वसनास त्रास होत असल्याने तिला मॅक्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

या वयोवृद्ध महिलेचे हृदय केवळ २५ टक्के कार्यरत आहे. तिला पाच हृदयविकाराचे झटके आले. त्यानंतर डॉक्टरांनी विविध उपचार प्रणाली उपयोगात आणल्या. शॉकद्वारे या महिलेच्या हृदयाचे कार्य पुन्हा सुरू करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. यासंदर्भात डॉक्टर बलबीर सिंह यांनी सांगितले की, या महिलेस पेसमेकर बसविण्यात आला आहे. त्यानंतरही तिला हृदयविकाराचे झटके आले. वृद्ध व्यक्तींमध्ये आरोग्याच्या समस्या गंभीर असतात.  अशा अवस्थेत त्यांना आलेला हृदयविकाराचा झटका त्यांच्या प्राणावर बेतू शकतो. या पार्श्वभूमीवर महिलेला हृदयविकाराचे झटके येऊनही त्यातून ती बचावणे ही आगळी घटना असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.  (वृत्तसंस्था)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका