पहिले शाही स्नान उत्साहात

By admin | Published: April 23, 2016 02:49 AM2016-04-23T02:49:25+5:302016-04-23T02:49:25+5:30

महिनाभर चालणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात शुक्रवारी पहिले शाही स्नान पार पडले. देशभरातून आलेले साधू आणि त्यांच्या शिष्यांनी दुपारच्या तळपत्या उन्हात शिप्रा नदीच्या रामघाटावर गर्दी केली होती

First royal baths | पहिले शाही स्नान उत्साहात

पहिले शाही स्नान उत्साहात

Next

उज्जैन : महिनाभर चालणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात शुक्रवारी पहिले शाही स्नान पार पडले. देशभरातून आलेले साधू आणि त्यांच्या शिष्यांनी दुपारच्या तळपत्या उन्हात शिप्रा नदीच्या रामघाटावर गर्दी केली होती. ‘जय श्रीराम’चा जयघोष करीत अनेकांनी नदीत डुबक्या घेतल्या. कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातील भाविकांनी गर्दी केली असून पहिल्यांदाच तृतीयपंथीयांनी येथे आखाडा उभारत ९ मे रोजी गंधर्व घाटावर स्नान करण्याची घोषणा केली आहे. पॅरिसमधून १२ जणांचा एक गट कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आला आहे.

Web Title: First royal baths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.